शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rajya Sabha Election: मोदींनी आपल्याच मंत्र्याचा पत्ता कापला; राज्यसभेचे तिकीट नाकारले; राजीनामा घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 9:46 AM

1 / 9
राज्यसभा निवडणुकीसाठी शह-काटशहाचे राजकारण सुरु झाले आहे. प्रत्येक पक्षाला राज्य स्तरावर आपला उमेदवार निवडून आणायचा आहे. सर्वात तीव्र स्पर्धा ही महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. एकेकाळी सख्खे मित्र असलेल्या शिवसेना-भाजपाने सहाव्या जागेसाठी आपापले उमेदवार दिल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.
2 / 9
तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याच एका मंत्र्याचा राज्यसभेचा पत्ता कापला आहे. त्यांचा कार्यकाळ जुलैमध्येच संपणार आहे. यामुळे मोदींच्या मनात नेमके काय आहे, यावर चर्चा सुरु झाल्या आहेत.
3 / 9
भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना राज्यसभेचे तिकिट मिळाले नाही. यामुळे त्यांना मंत्रिपद सोडावे लागू शकते. सध्या ते कार्यकाळ संपल्यावर सहा महिने मंत्रिपदावर राहू शकतात. मोदी यांनी आणखी एका मुस्लिम खासदाराला तिकीट नाकारले आहे.
4 / 9
राज्यसभा खासदार जफर इस्लाम यांना देखील तिकिट देण्यात आलेले नाही. भाजपाने सोमवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेशमधील जागांसाठी आणखी दोन नावांची घोषणाक केली. यामध्ये मिथिलेश कुमार आणि के. लक्ष्मण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
5 / 9
मिथिलेश कुमार हे शाहजहांपुर येथून लोकसभेवर निवडून गेले होते.त्यांनी २००९ मध्ये सपाकडून निवडणूक लढविली होती. तसेच ते एकदा अपक्ष तर एकदा सपाकडून असे दोनवेळा आमदारही राहिलेले आहेत.
6 / 9
के. लक्ष्मण हे भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय़ अध्यक्ष आहेत. अशाप्रकारे भाजपाने उत्तर प्रदेशमधून आठ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
7 / 9
भाजपाने उत्तर प्रदेशमधून रविवारी सहा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांसाठी आपली जागा सोडणाऱ्या अग्रवाल यांचे नाव होते. ते २००२ पासून गोरखपुरमधून विधानसभेवर निवडून येत होते. अग्रवाल यांच्यासह लक्ष्मीकांत वाजपेयी, सुरेंद्र सिंह नागर, बाबूराम निषाद, दर्शना सिंह आणि संगिता यादव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.
8 / 9
भाजपाकडे मित्रपक्षांसह एकूण 273 एवढे संख्याबळ आहे. ते सर्व उमेदवार निवडून आणू शकतात. तर सपाकडे 125 मते आहेत. ते तीन खासदार निवडून आणू शकतात. उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेसाठी एकूण 31 जागा आहेत. त्यापैकी ११ जागांवर निवडणूक होत आहे.
9 / 9
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आज आहे. १० जूनला मतदान होईल. एक जूनला अर्जाची छाननी आणि तीन जूनला अर्ज माघारीची मुदत आहे. १० जूनलाच मतमोजणी होणार आहे.
टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी