शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हर्षली अयोध्या नगरी..., फुलांची सजावट, रोषणाईमुळे मंदिराच्या सुंदरतेत भर, पाहा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 1:58 PM

1 / 8
अयोध्येमधील राम मंदिरामध्ये होत असलेल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. २२ जानेवारी रोजी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच अयोध्येत ठिकठिकाणी जय्यत तयारी केली जात आहे.
2 / 8
अयोध्येतील राम मंदिरामध्ये २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी देशासह जगभरातून निमंत्रित मान्यवर येण्याची शक्यता आहे. मंदिरामध्ये फुलांची सुंदर सजावट केली जात असून त्याचे काही फोटो आता समोर आले आहेत.
3 / 8
प्राणप्रतिष्ठाना सोहळ्यापूर्वी राम मंदिरामध्ये १६ जानेवारीपासून ५ दिवसीय अनुष्ठानास सुरुवात झाली आहे. मंदिरामध्ये हवन, यज्ञ आणि मत्रांचा जप सुरू आहे.
4 / 8
राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेबाबत देशभारातील लोकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. हजारो लोक अयोध्येत दाखल होत आहेत. तसेच अयोध्येला दिवाळीसारखी सजवण्यात आली आहे.
5 / 8
राम मंदिरामध्ये फुलांच्या सजावटीसह सुंदर रोषणाई करण्यात आली आहे. तसेच इतर कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी इथे विशेष लेझर शोचं आयोजनही करण्यात येणार आहे. या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.
6 / 8
रामललांची मूर्ती १९ जानेवारी रोजी गर्भगृहात स्थापन करण्यात आली आहे. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारी रोजी होणार आहे.
7 / 8
राम मंदिराच्या परिसरात आणि अयोध्येमध्ये करण्यात आलेली सुंदर सजावट ही पाहण्यासारखी आहे.
8 / 8
या सुंदर सजावटीवरून प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम किती भव्यदिव्य असेल याची कल्पना येते.
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या