Rapid Action Force deployed on Indus border, 20th day of agitation
सिंधू बॉर्डरवर 'रॅपिड अॅक्शन फोर्स' तैनात, आंदोलनाचा 20 वा दिवस By महेश गलांडे | Published: December 15, 2020 11:26 AM1 / 10देशातील आंदोलनाच्या १९ व्या दिवशीही शेतकऱ्यांची गर्दी वाढत असल्याने केंद्र सरकारची कोंडी होत आहे. वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांच्या दिवसभर बैठका सुरू असून यावर विचारविमर्श करण्यात आले.2 / 10देशभरात सोमवारी कृषी कायदे मागे घ्यावे यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांना घेराव घातले. सरकारचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी एक दिवसाचा उपवास केला. 3 / 10त्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सहभाग घेतला. या आंदोलनात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. 4 / 10दरम्यान, उत्तर प्रदेश, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, बिहार आणि हरयाणाच्या ऑल इंडिया कॉर्डिनेशन कमिटीअंतर्गत कार्यरत असलेल्या १० शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेऊन कृषी कायद्याला समर्थन दिले.5 / 10शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे, पण अद्यापही तोडगा निघाला नाही. त्यामुळे, आंदोलनाचा शेवट कधी होईल, शेतकऱ्यांना घरी कधी परतता येईल, याचीच काळजीपूर्वक चर्चा सुरू आहे. 6 / 10शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम असून सरकारकडून ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार घेण्यास तयार नाहीत. त्यातच गर्दी वाढत असल्याने सैन्य दलाच्या तुकड्याही सिंधु बॉर्डवर तैनात झाल्या आहेत. 7 / 10दिल्ली आणि हरयाणाच्या सिंधु बॉर्डवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही सरकारने आर्मीला पाचारण केले आहे. 8 / 10तिकरी बॉर्डरवरही सैन्य दलाच्या तुकड्यांचे आगमन झाले असून आंदोलनाला स्फोटक वळण लागू नये, यासाठी सुरक्षा जवान, सशस्त्र दलाचे जवान सीमारेषेवर तैनात झाले आहेत. 9 / 10चिल्ला सीमेवर शेतकऱ्यांना बसवून आंदोलकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारने केल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे संदीप आबा गिड्डे-पाटील यांनी लोकमतला सांगितले10 / 10मात्र, भाजपने २०० ते ३०० शेतकऱ्यांना दिल्लीतील चिल्ला सीमेवर बसवले होते. या शेतकऱ्यांचा संयुक्त किसान मोर्चाशी काही संबंध नसल्याचा खुलासा करण्यात आला. आणखी वाचा Subscribe to Notifications