रस्त्याचं काम सुरू असतानाच कोसळला हिमकडा, १० फूट बर्फाखाली गाडले गेले कामगार, घटनास्थळाचे थरकाप उडवणारे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 20:08 IST
1 / 9उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील माणा गावामध्ये आज सकाळी हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना घडली असून, त्यात ५७ कामगार गाडले गेले होते. यापैकी काही कामगारांना वाचवण्यात आलं असून, इतरांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या घटनास्थळावरचे भयावह फोटो समोर आले आहेत.2 / 9उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धाम जवळ हिमकडा तुटल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमध्ये ५७ कामगार हे बर्फाखाली गाडले गेले. त्यातील १० जणांना वाचवण्यात यश आले आहे. 3 / 9बद्रीनाथ धामपासून सुमारे ३ किमी पुढे माणा क्षेत्रामध्ये रस्ता बांधण्याचं काम सुरू होतं. याचदरम्यान, अचानक एक हिमकडा कोसळला आणि तिथे असलेले कामगार हे या बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले. 4 / 9सद्यस्थितीत घटनास्थळावर मदतकार्य वेगाने सुरू आहे. मात्र प्रचंड हिमवृष्टी आणि खराब हवामानामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. प्रशासन आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची टीम मदतकार्यात गुंतली आहे. 5 / 9या दुर्घटनेची माहिती मिळताच चमोली जिल्हा प्रशासन आणि बीआरओच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बर्फाखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी आधुनिक उपकरणांची मदत घेतली जात आहे. 6 / 9उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आपत्ती निवारण कक्षामध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. तसेच त्यांनी जिल्हा प्रशासनाला आणि बचाव पथकांना वेगाने काम करण्याची सूचना दिली आहे. 7 / 9परिसरात मोठ्या प्रमाणात होत असलेली हिमवृष्टी आणि वेगवान हवांमुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. येथील मदत कार्यात हेलिकॉप्टरचा वापर करण्याचा विचार होता. मात्र खराब हवामानामुळे उड्डाण शक्य होऊ शकलेलं नाही. 8 / 9दुर्घटनेचं गांभीर्य विचारात घेऊन मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क साधला आहे. तसेच केंद्र सरकारनेही उत्तराखंड सरकारला हरसंभव मदतीचं आश्वासन दिलं आहे. 9 / 9 काम सुरू असलेल्या ठिकाणापासूनच जवळच हे कामगार तात्पुरता आसरा करून राहत होता. दुर्घटनेनंतर या कामकारांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. दरम्यान, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार १५ कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर ४२ जणांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.