रेशन कार्डच्या नियमांमध्ये बदल, आता रेशन दुकानात न जाताही मिळवू शकता तुमच्या हक्काचं धान्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 15:10 IST
1 / 8रेशन कार्ड असूनही रेशन दुकानात सरकारी योजनेतून मिळणारं मोफत धान्य गरीबांना मिळत नाही. तर काहींना रेशन कार्ड असूनही रेशन दुकानापर्यंत पोहोचता येत नाही. अशा नागरिकांसाठी एक खास योजना आणण्यात आली आहे.2 / 8दिल्ली सरकारनं रेशन दुकानात मिळणाऱ्या धान्याच्या प्रक्रियेत काही बदल केले आहेत. नव्या नियमानुसार जे व्यक्ती वैद्यकीय कारणामुळे किंवा वयामुळे रेशन घेण्यासाठी दुकानापर्यंत पोहोचू शकत नाहीत ते यासाठी दुसऱ्या व्यक्तीला यासाठा नामांकित करू शकणार आहेत. 3 / 8नामांकित करण्यात आलेली व्यक्ती अशा व्यक्तींचं धान्य रेशन दुकानातून आणू शकते. रेशन दुकानामध्ये धान्य आणण्यासाठी कार्ड धारकाला बायोमेट्रिकवर बोटांचे ठसे द्यावे लागतात. त्यानंतरच धान्य दिलं जातं. 4 / 8काही लोक काही कारणामुळे दुकानात पोहचू शकत नाही. त्यामुळे सरकारकडून दिलं जाणारं मोफत धान्य अशा नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. पण नव्या नियमामुळे अशा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. 5 / 8ज्यांच्या कुटुंबात ६५ वर्षांपेक्षा जास्त किंवा १६ वर्षांपेक्षा कमी वयाचे सदस्य असतील आणि ते बायोमेट्रीकसाठी रेशन दुकानापर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशा कुटुंबांना नव्या योजनेचा लाभ मिळणार आहे. 6 / 8यासोबतच ज्या कुटुंबातील सदस्य अपंग आहेत किंवा एखाद्या आजारामुळे अंथरुणाला खिळलेले आहेत अशा कुटुंबांनाही मदत केली जाणार आहे. 7 / 8नव्या नियमानुसार अशा कुटुंबांना दुसऱ्या व्यक्तीला रेशन दुकानावरुन धान्य घेण्यासाठी नामांकित करता येणार आहे. संबंधित व्यक्ती या कुटुंबासाठी धान्य घेऊ शकणार आहे. पण नामांकित केलं जाणाऱ्या व्यक्तीकडे आधारकार्ड असणं गरजेचं असणार आहे. 8 / 8यासाठी रेशनकार्ड धारकाला एक फॉर्म भरावा लागणार आहे. यासोबत रेशन कार्ड आणि आधार कार्ड सोबत जोडावे लागणार आहे. तसंच नामांकित केल्या गेल्या व्यक्तीचीही कागदपत्रं सादर करावी लागतील. त्यानंतर नामांकित करण्यात आलेला व्यक्ती रेशन दुकानात जाऊन धान्याची खरेदी करू शकणार आहे.