PHOTOS: IPS जोडी! ट्रेनिंगदरम्यान केलं प्रपोज; आयुष-अनु यांची 'भारी' लव्हस्टोरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 16:49 IST
1 / 10काही दिवसांपूर्वीच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल लागला. यानंतर देशातील-राज्यातील टॉपर्सवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच एक आयपीएस जोडी चांगलीच चर्चेत आली आहे.2 / 10मध्य प्रदेशातील आयपीएस अधिकारी अनु बेनीवाल यांचे यश हे अनेकांसाठी प्रेरणा आहे. पण, त्या आता त्यांच्या प्रेम कहाणीमुळे चर्चेत आल्या आहेत.3 / 10अनु बेनीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांना पती आणि आयपीएस अधिकारी आयुष जाखड प्रपोज करताना दिसत आहेत.4 / 10त्यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतील आहे.5 / 10अनु यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, आमच्या आयुष्यातील माझ्या आवडत्या सर्वोत्तम क्षणांपैकी एक क्षण... थँक यू, आयपीएस डॉ. आयुष जाखड.6 / 10खरे तर आयुष जाखड आणि अनु बेनीवाल हे एकाच बॅचचे IPS अधिकारी आहेत. दोघांनी २०२२ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले. 7 / 10आयुष यांचे वडील दिलीप जाखड हे देखील एक निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. आयुष यांना त्यांच्या वडिलांप्रमाणे आजोबांनी या परीक्षेसाठी प्रेरणा दिली होती.8 / 10आयुष जाखड हे राजस्थानातील श्रीगंगानगर येथील रहिवासी आहेत. एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी केली.9 / 10अनु बेनीवाल ह्या दिल्लीतील पीतमपुरा येथील रहिवासी आहेत. मागील काही काळात त्यांनी अवैध खाणकामाशी संबंधित अनेक वाहनांवर कारवाई केली. 10 / 10अनु यांनी तिसऱ्या प्रयत्नात UPSC मध्ये २१७ वी रँक मिळवली, तर आयुष जाखड यांना १७४ वी रँक मिळाली. अनु बेनीवाल यांना २०१८ आणि २०१९ मध्ये अपयश आले होते.