Relationship of seven births: Acid attack at the age of 17, now the girl is married to her boyfriend
सात जन्माचं नातं: १७ व्या वर्षी झाला होता अॅसिड हल्ला, आता मुलीनं केला आपल्या बॉयफ्रेन्डशी विवाह By पूनम अपराज | Published: March 03, 2021 3:28 PM1 / 14प्रमोदिनी वयाच्या १७ व्या वर्षी अॅसिड हल्ल्यामुळे ग्रस्त होती आणि तिचे शरीर ८० टक्के जळून गेले होते. या हल्ल्यामुळे प्रमोदिनी दोन्ही डोळे देखील गमावून बसली होती. 2 / 14या भीषण हल्ल्यानंतरही प्रमोदिनी उर्फ राणीचे धैर्य कमी झाले नाही.तिने आपल्या पायावर उभे राहण्यासाठी पूर्ण ताकद लावली. जगतसिंहपुरच्या कनकपूर गावात लग्नानंतर प्रमोदिनी म्हणाली की, हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला दिवस आहे. मला माझ्या कुटुंबाच्या आणि प्रियकराच्या कुटूंबाच्या संमतीने लग्न करायचे होते आणि सर्व काही घडले.3 / 14विशेष म्हणजे, प्रमोदिनी या तीन बहिणींपैकी एक २००९ मध्ये महाविद्यालयात इंटरमीडिएटचा अभ्यास करत होती, तेव्हा संतोष वेदांत कुमार नावाच्या युवकाने लग्नाचा प्रस्ताव दिला.4 / 14मात्र, जेव्हा प्रमोदिनींने या प्रस्तावाला मान्य केले नाही, तेव्हा त्याने प्रमोदिनीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. 5 / 14प्रमोदिनी महाविद्यालयाजवळ सैन्य शिबिर चालू होते, तेव्हा संतोषने प्रमोदिनीला पाहिले आणि त्याचवेळी तिला लग्नाचा प्रस्ताव पाठविला. प्रमोदिनी त्यावेळी खूपच लहान होती आणि तिला आपला अभ्यास सुरू ठेवण्याची इच्छा होती, तेव्हा त्या कुटुंबाने लग्नाचा प्रस्ताव नाकारला.6 / 14तेव्हा त्या कुटुंबाने लग्नाचा प्रस्ताव नाकारला. यानंतरही संतोष वेदांतने प्रमोदिनीचा पाठलाग सुरू ठेवला आणि ४ मे २००९ रोजी प्रमोदिनीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले.7 / 14त्यात तिचे शरीर जळून खाक झाले आणि तिचे अर्धे शरीर अर्धांगवायूग्रस्त झाले. 8 / 14अॅसिड हल्ल्याविरोधात प्रमोदिनीने एफआयआर नोंदविला होता, परंतु २०१२ पर्यंत पोलिसांना काही कळू शकले नाही आणि शेवटी पोलिसांनी आरोपी संतोष कुमारविरूद्ध हा खटला बंद केला.9 / 14संतोष आणि त्याची पत्नी त्यावेळी मुलासह कुपवाडा येथे राहत होते. पण नंतर जेव्हा हे प्रकरण पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 10 / 14तेव्हा मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्या युवतीची भेट घेतली आणि या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले. संतोषला २०१७ मध्ये अटक करण्यात आली होती, त्यानंतर तो अजूनही तुरूंगात आहे.11 / 14२०१४ मध्ये, भुवनेश्वरच्या बालकटी प्रांताच्या सरोज साहू प्रमोदिनीला प्रथमच भेटला. प्रमोदिनी ज्या रुग्णालयात उपचार घेत होती. 12 / 14त्या रुग्णालयातील एक नर्स सरोज साहूची मैत्रीण होती. अॅसिड हल्ल्यातील पीडितेच्या समस्या जाणून घेण्यासाठी तिने साहूला बोलावले होते.13 / 14साहूने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण प्रमोदिनीने प्रतिक्रिया दिली नाही कारण ती त्या घटनेमुळे घाबरली होती आणि जास्त कोणाशीही बोलत नव्हती. 14 / 14पण हळूहळू जेव्हा त्या दोघांच्या भेटी वाढू लागल्या तेव्हा दोघे चांगले मित्र बनले. अखेर दोघांच्या कुटुंबियांनीही लग्नाला होकार दिला. आणखी वाचा Subscribe to Notifications