Remember if you use your wife's ATM! Woman loses 25000; SBI denied the claim
पत्नीचे ATM वापराल तर याद राखा! महिलेने गमावले 25000; SBI ने दावा नाकारला By हेमंत बावकर | Published: October 26, 2020 6:04 PM1 / 11अनेकदी पत्नीचे एटीएम कार्ड वापरून पती पैसे काढतात. पत्नीचेच तर आहे, त्यात काय एवढे असा त्यांचा समज असतो. परंतू स्टेट बँकेने पतीला पत्नीचे एटीएम वापरता येणार नाही, असे सांगितले आहे. 2 / 11बँका सुरक्षेचा उपाय़ म्हणून आपल्या एटीएमचा पिन, ओटीपी आणि अन्य माहिती कोणाला देऊ नका असे मेसेज वारंवार पाठवतात. मात्र, आपण जवळचा व्यक्ती यामध्ये भाऊ, बहीण, पती, पत्नी यांना आपला पिन सांगतो. कारण बऱ्याचदा आपल्याला पैसे काढणे जमणारे नसते. 3 / 11बँकांचा हा नियम पती-पत्नीच्या नात्यालाही लागू होतो. कारण या नियमामध्ये कोणासोबत शेअर करू नका, असे स्पष्ट म्हटलेले आहे. याचाच अर्थ कोणी म्हणजे कोणीही नाही, अगदी पती असला तरीही त्याला पिन, एटीएम द्यायचे नाही. 4 / 11पती, मित्र किंवा जवळचा नातेवाईक यापैकी कोणालाही एटीएम वापरण्यास दिले आणि हे जरी त्यात काय एवढे, असे वाटत असले तरीही ते महागात पडू शकते. कसे ते पहा...5 / 11हा प्रकार बेंगळुरूमध्ये घडला आहे. येथील एक महिला प्रेग्नंट होती. त्यामुळे ती मॅटर्निटी लिव्हवर होती. तिने तिचे एटीएम कार्ड तिच्या नवऱ्याकडे दिले, जे हस्तांतर करणे बेकायदा होते. दोघांनाही याची माहिती नव्हती. 6 / 11खरेतर 2013 मधील हे प्रकरण आहे. महिलेचे नाव वंदना आहे. तिने स्थानिक एसबीआय एटीएम सेंटरमधून 25000 रुपये काढण्यासाठी तिचे एटीएम पतीला दिले. पती पैसे काढायला गेला असता त्याला पैसे आल्याची स्लीप आली परंतू पैसे काही आले नाहीत. तसेच खात्यातूनही पैसे वजा झाले. 7 / 11तसे पाहिल्यास हा एटीएमचा दोष होता. म्हणून तिचा पती राजेश कुमारने एसबीआय कस्टमर केअरला फोन करून तक्रार केली. त्यांनीही पैसे 24 तासांत खात्यात येतील असे सांगितले. मात्र, पैसे परत काही आले नाहीत. 8 / 11शेवटी राजेशने एसबीआयच्या हेलिकॉप्टर डिव्हिजन ब्रांचकडे तक्रार केली. चौकशी झाली असता एसबीआयने खातेदाराला पैसे देणे नाकारले. यासाठी जे कारण दिले ते सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. 9 / 11बँकेने दिलेले एटीएम खातेदाराशिवाय कोणीही वापरायचे नाही. खातेदाराने कोणालाही पिन द्यायचा नाही, हे एटीएम कार्ड खातेदाराशिवाय अन्य व्यक्तीने वापरले आहे. त्यामुळे आम्ही त्यास जबाबदार नसून क्लेम रिक्वेस्ट फेटाळली जात आहे, असे बँकेने म्हटले. 10 / 11यानंतर वंदना यांनी माहिती अधिकाराचा वापर केला. तपासणीमध्ये एटीएम केंद्रातली त्या दिवशीची रक्कम 25000 रुपये जास्त होती. ग्राहक न्यायालयात गेले तरीही एसबीआयने पुन्हा तिला पैसे देण्यास नकार दिला. कारण एकच ‘PIN shared, case closed.’11 / 11यानंतर साडेतीन वर्षे वंदना अतिरिक्त न्यायालयात लढत होती. तिथेही तिच्या हाती निराशा आली. न्यायालयाने सांगितले की, पतीला पैसे काढायचे असतील तर पत्नीने त्याला सेल्फ चेक किंवा ऑथरियझेशन लेटर द्यावे. आणखी वाचा Subscribe to Notifications