शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ना पासपोर्ट, ना व्हिसा; दिल्लीत एकाच ठिकाणी जगातील 7 आश्चर्य पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 1:39 PM

1 / 8
जग फिरावं, जगातील सात आश्चर्य पाहावीत, हे अनेकांचं स्वप्न असतं. दिल्लीतल्या अनेकांचं हे स्वप्न आता पूर्ण होणार आहे आणि तेही अगदी स्वस्तात.
2 / 8
दक्षिण दिल्ली महानगरपालिकेनं सात आश्चर्य उभी केली आहेत. निजामुद्दीन रेल्वे स्टेशनजवळच्या एका बगिच्यामध्ये सात आश्चर्यांची उभारणी करण्यात आली आहे.
3 / 8
भंगारातील लोखंडापासून या वास्तूंची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र अद्याप हे उद्यान सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं करण्यात आलेलं नाही.
4 / 8
राजीव गांधी स्मृतीवनमध्ये सात आश्चर्य उभारण्यासाठी 4.7 कोटी रुपयांचा खर्च आला.
5 / 8
पिरॅमिडची उंची 18 फूट असून कोलोसिअमची उंची 15 फूट इतकी आहे.
6 / 8
उद्यानात उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि ताजमहालची उंची 30 फूट आहे.
7 / 8
लवकरच हे उद्यान सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात येणार आहे.
8 / 8
उद्यानात उभारण्यात आलेल्या आयफेल टॉवरची उंची 60 फूट, तर पिसाच्या झुकत्या मनोऱ्याची उंची 25 फूट आहे.
टॅग्स :tourismपर्यटनTravel Tipsट्रॅव्हल टिप्स