शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Republic Day: लष्कर, नौदल आणि हवाई दलानं जगाला दाखवली भारताची 'ताकद'; हेलिकॉप्टर, टँक अन् राफेलची 'गर्जना'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 1:58 PM

1 / 11
राजपथावर प्रजासत्ताक दिनी संचलनात DRDO च्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन केले गेले. यात DRDO ने पाणबुडीसाठी तयार केलेल्या एअर इंडिपेंन्डंट प्रोपल्शन सिस्टम (AIP Systerm) तंत्रज्ञान सादर केलं.
2 / 11
JAK LIच्या ५ व्या बटालियनचे मेजर रितेश तिवारी यांच्या नेतृत्त्वात जम्मू-काश्मीर लाइट इन्फेंट्रीच्या (JAK LI) तुकडीनं राजपथावर आज संचलन केलं. तुकडीनं १९७० च्या दशकातील भारतीय सैन्याचा पोशाख आणि ७.६२ एमएम एसएलआर शस्त्र घेऊन मार्च केला.
3 / 11
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये १५५ हेलिकॉप्टर युनिटच्या चार Mi-17V5 हेलिकॉप्टरने वाइनग्लास फॉर्मेशनमध्ये उड्डाण केलं.
4 / 11
भारतीय हवाई दलाच्या चित्ररथात 'भविष्यातील भारतीय हवाई दलातील परिवर्तन' या विषयावर सादरीकरण करण्यात आलं होतं. यात मिग-२१, Gnat, लाइट कॉम्बेट हेलिकॉप्टर (LCH), अश्लेषा रडार आणि राफेल विमानाचे स्केल-डाऊन मॉडल सादर करण्यात आले होते.
5 / 11
हवाई दलाचा चित्ररथ मोठ्या थाटात संचलन करत होता. यातून भारतानं जगाला आपल्या हवाई दलाच्या ताकदीचं दर्शन घडवलं.
6 / 11
परेडमध्ये MBT अर्जुन MK-I टँकची तुकडी देखील सहभागी झाली होती. भारतीय लष्करासाठी डीआरडीओनं विसकीत केलेले हे थर्ड जनरेशन मुख्य लढाऊ टँक आहेत.
7 / 11
भारतीय नौदलाचंही संचलन झालं. यात भारतीय नौदलानं संपूर्ण जगाला देशाची नौदल ताकद दाखवून दिली.
8 / 11
भारतीय नौदलाच्या चित्ररथानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यात 'मेड इन इंडिया' एअरक्राफ्ट कॅरिअर INS विक्रांतची झलक दाखवण्यात आली होती.
9 / 11
राजपथावरील संचलनात सेंच्युरिअन टँकच्या तुकडीनं मोठ्या दिमाखात संचलन केलं.
10 / 11
संचलनात PT-76 टँकची तुकडीनंही सहभाग घेतला होता. सोव्हियत काळापासूनचा हा लाइट टँक आहे. या टँकची निर्यात भारत, इराक, सीरिया, उत्तर कोरिआ आणि उत्तर व्हिएतनामसारख्या इतर मित्र देशांना व्यापक स्वरुपात करण्यात आली आहे.
11 / 11
राजपथावरील संचलनात APC Topaz च्या तुकडीनंही सहभाग घेतला होता. याची पोलीस पीपल्स रिपब्लिक आणि चेकोस्लोवाकिया द्वारे संयुक्त विद्यमानं विसकीत करण्यात आली आहे.
टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनIndian Armyभारतीय जवानindian navyभारतीय नौदलindian air forceभारतीय हवाई दल