शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साता समुद्रा पार, भारताचा जयजयकार! परदेशी नागरिकांनी खास अंदाजात दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 2:28 PM

1 / 9
आज भारतात 75वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. संपूर्ण देश हा दिवस साजरा करत आहे. याशिवाय, परदेशातही भारताचा डंका वाजत आहे. जयजयकार होत आहे. परदेशातही भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. अनेक देश भारताला शुभेच्छा देत आहेत. ओमानमधूनही भारतीय दूतावासाने सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
2 / 9
रशिया, अमेरिका, फ्रान्स आणि इतरही अनेक देशांनी भारताला प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय तेथील दुतावासात कार्यक्रमही पार पडले.
3 / 9
रशियन दूतावासात मुलांनी हिंदी गाण्यांवर जबरदस्त डान्स करत भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला.
4 / 9
रशियन दूतावासात कार्यक्रमादरम्यान रशियन मुलांच्या हाती भारताचा झेंडाही दिसून आला.
5 / 9
रशियन दुतावासात युवक-युवतींनी डान्स करत भारताचा प्रजासत्ताक दिवस साजरा केला.
6 / 9
फ्रान्स, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातही भारतीय नागरिकांनी आणि दूतावासातील स्टाफने भारतीय प्रजासत्ताक दिवस साजरा केला.
7 / 9
जपानमधील भारतीय दूतावासाने दूतावासात भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाची झलक शेअर केली. राजदूत सिबी जॉर्ज यांनी तिरंगा फडकवला आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राष्ट्राला उद्देशून केलेले अभिभाषण वाचून दाखवले.
8 / 9
जापाननेही भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
9 / 9
भारतातील रशियाच्या दूतावासाने भारताच्या प्रजासत्ताक दिन 2024 निमित्त उत्सव आयोजित केला होता
टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२४russiaरशियाJapanजपान