शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

"कोरोनापेक्षा 20 पटीने मोठा आजार, 5 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू"; WHO चा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 10:51 AM

1 / 9
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने जगभरात एका मोठ्या आजाराचा इशारा जारी केला असून, या नवीन आजाराचं नाव एक्स असं असून यामुळे 5 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
2 / 9
डिसीज X हा कोरोना महामारीपेक्षा 20 पट मोठा आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस अदनोम घेब्रेयसस यांनी म्हटलं आहे की, डिसीज X हा कधीही येऊ शकतो आणि यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. हा अत्यंत घातक आहे आणि तो टाळण्यासाठी वैज्ञानिक लस बनवण्याचे काम करत आहेत.
3 / 9
डब्ल्यूएचओने सांगितले की, कोरोना महामारीमुळे सुमारे 25 लाख मृत्यूंचा अंदाज आहे, परंतु हा नवीन रोग त्यापेक्षा जास्त प्राणघातक आहे आणि त्यामुळे सुमारे 5 कोटी लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.
4 / 9
जागतिक आरोग्य तज्ज्ञांनी या नवीन आजाराबाबत म्हटले आहे की, डिसीज X मुळे स्पॅनिश फ्लूसारखा विनाश होण्याची भीती आहे. 1918-1920 मध्ये, स्पॅनिश फ्लूमुळे जगभरात 5 कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
5 / 9
यूके व्हॅक्सिन टास्कफोर्सचे अध्यक्ष केट बिंघम यांनी सांगितले की, अशा महामारीमुळे लाखो लोकांचा जीव जातो. पहिल्या महायुद्धात स्पॅनिश फ्लूमुळे अकाली मरण पावलेल्या लोकांची संख्या दुप्पट आहे.
6 / 9
ते म्हणाले की, आता पूर्वीपेक्षा जास्त व्हायरस आहेत आणि त्यांचे व्हेरिएंट देखील खूप लवकर संक्रमित करतात. जरी सर्व व्हेरिएंट घातक नसले तरी ते पुढे साथीचे रोग होऊ शकतात. सुमारे 25 व्हायरस ओळखले गेले आहेत आणि शास्त्रज्ञ लवकरच लस तयार करतील.
7 / 9
WHOने म्हटलं आहे की, नवीन आजारापासून लोकांना वाचवण्याची गरज आहे. हे सर्व संसर्गजन्य रोग आहेत आणि त्यामुळे साथीचे रोग पसरतील. यामध्ये इबोला व्हायरस, मारबर्ग, सीवियर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम, कोविड-19, झिका, मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम इत्यादींसह नवीन रोगाचा समावेश आहे.
8 / 9
यापैकी एक्स हा रोग सर्वात धोकादायक मानला जातो. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनापूर्वीही हा आजार पसरला होता; ज्याला कोरोना असे नाव देण्यात आले. हा शब्द वापरला जातो कारण रोगाचा शोध लागताच त्याला ते नाव दिले जाईल. हा एक प्रकारचा प्लेसहोल्डर आहे.
9 / 9
वैद्यकीय शास्त्रातील अज्ञात रोगांसाठी याचा वापर केला जातो. सध्या, शास्त्रज्ञांना या रोगाचे स्वरूप आणि प्रकार याबद्दल स्पष्ट माहिती नाही. म्हणून याला डिसीज एक्स असे नाव देण्यात आले आहे जेणेकरून पुढच्या वेळी नवीन रोग सापडला की त्याचे नाव बदलले जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना