शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मिशन जम्मू-काश्मीर! अखेर ६८३ दिवसांनंतर पंतप्रधान मोदी आणखी एक मोठा निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 4:19 PM

1 / 9
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला लवकरच दोन वर्ष पूर्ण होतील. जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा ऑगस्ट २०१९ मध्ये काढून घेण्यात आला.
2 / 9
जम्मू-काश्मीरबद्दल मोदी सरकार आता लवकरच आणखी एक मोठा निर्णय घेणार असल्याचं समजतं. याबद्दलची योजना तयार झाली असल्याचं वृत्त 'आज तक'नं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
3 / 9
पंतप्रधान मोदींनी २४ जूनला एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह सरकारमधील आणखी काही महत्त्वाचे मंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत.
4 / 9
५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयानं देशाच्या राजकारणात खळबळ उडाली. जम्मू-काश्मीरमधील सर्वच राजकीय पक्षांनी, देशातील विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. यानंतरही मोदींनी जम्मू-काश्मीरच्या नेत्यांशी संवाद साधलेला नव्हता.
5 / 9
आता जवळपास ६८३ दिवसांनंतर पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरच्या नेत्यांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. जम्मू-काश्मीरबद्दलची सरकारची योजना या बैठकीत मांडली जाणार आहे.
6 / 9
जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा राज्याचा दर्जा देण्याचा विचार मोदी सरकारकडून सुरू आहे. त्याबद्दल २४ जूनला होणाऱ्या बैठकीत चर्चा होऊ शकते. याबद्दल शुक्रवारी अमित शहांनी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती.
7 / 9
अमित शहांनी घेतलेल्या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबद्दल व्यापक चर्चा झाली. राजकीय स्थितीबद्दल विचार मंथन झालं. दहशतवादी कारवायांबद्दलचा अहवालदेखील बैठकीत ठेवण्यात आला.
8 / 9
२४ जूनला होणाऱ्या बैठकीत जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासोबतच विधानसभा निवडणूक घेण्याबद्दलही चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
9 / 9
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक झाल्यास एका दगडात दोन पक्षी मारले जातील. यामुळे जम्मू काश्मीरमधील शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल. याशिवाय जम्मू-काश्मीरमधील स्थिती आलबेल असल्याचा संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल. त्याचा थेट फटका पाकिस्तानला बसेल.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरAmit Shahअमित शहाArticle 370कलम 370