rickshaw puller dilkhush kumar became cab company owner in bihar
नेत्रदिपक भरारी! रिक्षाचालक झाला कॅब कंपनीचा मालक; 'असा' होता यशाच्या दिशेने संघर्षमय प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2023 12:46 PM1 / 12प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादाय़ी घटना समोर आली आहे. बिहारच्या सहरसा येथील दिलखुश कुमार दिल्लीच्या रस्त्यावर रिक्षा चालवायचा. पण आता दिलखुशची स्वतःची स्टार्टअप कंपनी आहे. 2 / 12दिलखुश एक कॅब कंपनी अत्यंत यशस्वीपणे चालवत आहे. त्याची यशोगाथा खूपच जास्त रंजक आहे. रिक्षाचालक होण्यापासून ते कॅब कंपनीचा मालक होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. अनेक अडचणींचा त्याने सामना केला. त्याची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया...3 / 12दिलखुश कुमार हा बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील बनगावचा रहिवासी आहे. त्याच्या कॅब कंपनीशी आतापर्यंत 3200 हून अधिक वाहने जोडली गेली आहेत. 2023 अखेर 25 हजार वाहने जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.4 / 12दिलखुश कुमारने फक्त बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. दिलखुशच्या वडिलांचे नाव पवन खान आहे. पवन खान हे बस चालक आहेत. बस ड्रायव्हरचा मुलगा बस ड्रायव्हर होईल असे शेजारचे लोक म्हणायचे.5 / 12दिलखुशला खासगी शाळेत शिपाई व्हायचे होते. प्रयत्नही केला पण यश मिळालं नाही. त्यामुळे रोजगाराच्या शोधात दिल्लीला गेला. दिल्लीत रिक्षा चालवायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात आजाराने ग्रासले, म्हणून तो सहरसाला परतला 6 / 12दिलखुशने काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. दिलखुशने स्टार्टअप योजनेअंतर्गत 2016 मध्ये साडेपाच लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर AryaGo या नावाने कॅब सेवा सुरू केली. यामध्ये सुमारे 350 गाड्या धावतात. 29 वर्षीय दिलखुश कुमार यांनी आतापर्यंत दोन कंपन्या सुरू केल्या आहेत. 7 / 12AryaGo ची स्थापना 2016 मध्ये झाली. याशिवाय तो RodBez नावाची कॅब कंपनीही चालवत आहे. त्यांच्या कंपनीच्या नेटवर्कमध्ये चार हजारांहून अधिक वाहने आहेत. रोडबेस वेगवेगळ्या शहरांना कॅब पुरवते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.8 / 12 (सर्व फोटो - सोशल मीडिया)9 / 12 (सर्व फोटो - सोशल मीडिया)10 / 12 (सर्व फोटो - सोशल मीडिया)11 / 12 (सर्व फोटो - सोशल मीडिया)12 / 12 (सर्व फोटो - सोशल मीडिया) आणखी वाचा Subscribe to Notifications