शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हास्यास्पद पण 'व्यावहारिक'... ही आईस्क्रीम खाल्लीय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 10:25 AM

1 / 8
भारतीय संस्कृती आणि प्रदेशानुसार सकाळच्या नाश्त्याचेही पदार्त भिन्न असतात. महाराष्ट्रात सकाळचा नाष्ता तसा पोहे, उपमा आणि शिरा असाच आहे.
2 / 8
महाराष्ट्राबाहेरचा विचार केल्यास, दक्षिण भारतात सकाळचा नाश्ता हा बहुतांश इडली सांबर, उडीत वडा, डोसा, उताप्पा असाच असतो.
3 / 8
तुम्ही उत्तरेकडे म्हणजे दिल्ली, पंजाबकडे गेल्यास तुम्हाला मुख्यत्वे पराठे हे सकाळच्या नाश्त्याला खायला मिळतील. तसं, पाहिल्यास आज सर्वच ठिकाणी हे सर्वच पदार्थ मिळतात.
4 / 8
दक्षिण भारतातील इडली ही देशभर पसरली आहे, उडपी हॉटेलच्या माध्यमातून, इडलीवाल्या अण्णांच्या गाडीतूनही इडली गावोगावी पोहोचलीय.
5 / 8
विशेष म्हणजे या इडलीची चव आणि सांबर-चटणीची गोडी मराठीजनांच्याही जिभेवर रेंगाळते, म्हणून महाराष्ट्रातही दाक्षिणात्य पदार्थ आवडीने चाखले जातात.
6 / 8
बंगळुरूतील एका हॉटेल व्यावसायिकाने हीच इडली वेगळ्या स्टाईलने ग्राहकांपुढे ठेवली आहे. आईस्क्रीमच्या आकारात काडीत ही इडली बनवून सांबर चटणी पुढ्यात आहे.
7 / 8
हॉटेलमालकाची ही स्टाईल अनेकांना भावली आहे, त्यामुळेच सोशल मीडियावरुन या हॉटेलच्या ईडली स्टाईलचे फोटो शेअर करण्यात येत आहेत.
8 / 8
विशेष म्हणजे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरुर यांनाही ही स्टाईल भावली. म्हणूनच त्यांनी हा फोटो ट्विट करुन हे हास्यास्पद आहे, पण व्यवहारीकही तेवढचं असल्याचं त्यांनी म्हटलं.
टॅग्स :BengaluruबेंगळूरShashi Tharoorशशी थरूरTwitterट्विटर