शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

RIP 'कॉलरवाली'! पेंचमधील लाडक्या वाघिणीला भावूक निरोप; पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 8:50 PM

1 / 9
‘कॉलरवाली’ म्हणून लोकप्रिय असलेली पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिवनी (मध्य प्रदेश) जंगलातील टी-१५ वाघिणीचे निधन झाले. वयाच्या साडे १६ व्या वर्षी कर्माझरीच्या कोर वनक्षेत्रातील बुढादत्त नाला, रय्यकसा कॅम्पअंतर्गत कुंभादेव कक्ष परिसरात, शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान ती मृतावस्थेत आढळली होती. फोटो : क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्रप्रकल्प, (मध्य प्रदेश)
2 / 9
स्वत:चे शरीर चाटण्याच्या सवयीमुळे पाेटात गेलेल्या केसांचा गाेळा जमा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील आठवड्यापासून टी-१५ वाघिणीवर देखरेख ठेवणे सुरू हाेते. मात्र, शनिवारी जंगलात तिची हालचाल दिसून न आल्याने वनविभागाच्या पथकाने शोध सुरू केला. तेव्हा घटनास्थळी ती मृतावस्थेत आढळली. फोटो : क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्रप्रकल्प, (मध्य प्रदेश)
3 / 9
17 वर्षीय वाघिणीनं तिच्या आयुष्यात 29 बछड्यांना जन्म दिला आहे. यासाठी तिला 'सुपरमॉम' असंही म्हटलं जातं. फोटो : क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्रप्रकल्प, (मध्य प्रदेश)
4 / 9
कॉलरवाल्या वाघिणीचा जन्म पेंचच्या सिवनी क्षेत्रात सप्टेंबर, २००५ साली झाला. त्यानंतर, तिची आई टी-७ वाघिणीचा मृत्यू झाला. वयस्क झाल्यावर टी-१५ वाघिणीने आईचा वारसा सांभाळला. ती ‘काॅलरवाली वाघीण’ म्हणून लाेकप्रिय झाली. फोटो : क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्रप्रकल्प, (मध्य प्रदेश)
5 / 9
एका वेळी पाच शावकांना जन्म देण्याचा विक्रम काॅलरवाली वाघिणीच्या नावे आहे, शिवाय सर्वाधिक शावकांना जन्म देण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे. यापूर्वी राजस्थानच्या रणथंबाेर व्याघ्र प्रकल्पातील जगप्रसिद्ध ‘मछली’ वाघिणीच्या नावावर २३ शावकांना जन्म देण्याचा विक्रम हाेता. फोटो : क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्रप्रकल्प, (मध्य प्रदेश)
6 / 9
२००८ साली तिच्या देखरेखीसाठी देहरादूनच्या वाइल्ड लाइफ तज्ज्ञांनी तिला रेडियो कॉलर लावला हाेता. त्यामुळे ती ‘काॅलरवाली वाघीण’ म्हणून प्रसिद्ध झाली. फोटो : क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्रप्रकल्प, (मध्य प्रदेश)
7 / 9
वाघीण मे, २००८ ते २०१८ पर्यंत आठ वेळा गराेदर राहिली आणि २९ शावकांना जन्म दिला. काॅलरवालीने मे, २००८ साली पहिल्यांदा तीन बछड्यांना जन्म दिला हाेता. यानंतर ऑक्टाेबर, २००८ मध्ये चार शावक, ऑक्टाेबर, २०१० साली पाच शावक, मे, २०१२ साली तीन शावक, ऑक्टाेबर, २०१३ मध्ये तीन शावक, एप्रिल, २०१५ मध्ये चार शावक, २०१७ साली तीन आणि २०१८ मध्ये ४ शावकांना जन्म दिला होता. फोटो : क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्रप्रकल्प, (मध्य प्रदेश)
8 / 9
वाघिणीला निरोप देताना सर्वांचे डोळे पाणावलेले पाहायला मिळाले. फोटो : क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्रप्रकल्प, (मध्य प्रदेश)
9 / 9
वाइल्ड लाइफ फोटोग्राफर सरोश लोधी यांनी टिपलेला 'कॉलरवाली' वाघिणीचा अप्रतिम फोटो
टॅग्स :TigerवाघMadhya Pradeshमध्य प्रदेश