शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे! कोरोना चाचणीसाठी वारंवार स्वॅब सँपल घेतल्याने Black Fungus चा मोठा धोका; रिसर्चमधून दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 2:55 PM

1 / 14
देशात कोरोनाचा वेग थोडा मंदावताना दिसत आहे. कोरोनाग्रस्तांच्या एकूण संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर चार लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र असं असताना Black Fungus चा धोका वाढला आहे.
2 / 14
रुग्णालयातील 352 मधील 230 रुग्णांचं दोनदा चाचणीसाठी सँपल घेण्यात आले होते. 230 मधील 116 ब्लॅक फंगसचे रुग्ण होते आणि त्यांची दोनहून अधिक वेळा कोरोना चाचणी करण्यात आली होती.
3 / 14
'म्युकोरमायकोसिस' असं या आजाराचं नाव असून कोरोना रुग्णांमध्ये हे प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. ब्लॅक फंगसने (Black Fungus) थैमान घातले आहे. देशामध्ये म्युकोरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण सातत्याने वाढत आहेत
4 / 14
देशात ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत आहे. सातत्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.
5 / 14
कोरोना चाचणीसाठी वारंवार स्वॅब सँपल घेतल्याने Black Fungus चा मोठा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. रिसर्चमधून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. दिल्लीतील एम्समध्ये याबाबत एक रिसर्च करण्यात आला आहे.
6 / 14
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, सँपल घेताना स्वॅब स्टिक नाकात फिरवल्यानंतर फंगस आणि बॅक्टेरियाला शरीरात शिरण्यापासून रोखणाऱी नेसल म्यूकोसाला धक्का बसतो. त्यामुळे ब्लॅक फंगसचा धोका हा अधिक वाढत आहे.
7 / 14
एम्सचे मेडिसिन विभागाचे प्रमुख प्रोफेसर नवीत विग यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रिसर्चमध्ये 352 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. ज्यामधील 152 रुग्ण हे कोरोनासोबतच ब्लॅक फंगसचे होते.
8 / 14
रुग्णालयातील 352 मधील 230 रुग्णांचं दोनदा चाचणीसाठी सँपल घेण्यात आले होते. 230 मधील 116 ब्लॅक फंगसचे रुग्ण होते आणि त्यांची दोनहून अधिक वेळा कोरोना चाचणी करण्यात आली होती.
9 / 14
नेसल म्यूकोसाला इजा पोहचल्यामुळे रोगप्रतिरोधक क्षमता कमी होते. ज्यामुळे हवेत असलेले फंगस हे अत्यंत सहज शरीरात प्रवेश करतात. त्यामुळेच इतरही आजाराचा धोका वाढतो. डॉक्टरांनी याबाबत मोलाचा सल्ला दिला आहे.
10 / 14
रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची सातत्याने कोरोना चाचणी करू नये असं म्हटलं आहे. रिसर्चमध्ये मधुमेह असलेल्य रुग्णांना ब्लॅक फंगसचा अधिक धोका असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
11 / 14
रुग्णांवर सर्जरी केल्यानंतरही Black Fungus चा पुन्हा धोका असल्याची आता माहिती मिळत आहे. यामुळे डॉक्टरही हैराण झाले असून वेळीच सावध असं सांगण्यात येत आहे. सर्जरीनंतरही ब्लॅक फंगस वेगाने पसरत आहे.
12 / 14
एसएमएस मेडिकल कॉलेजच्या म्युकोरमायकोसिस बोर्डच्या रिसर्चमध्ये याबाबत मोठा खुलासा करण्यात आला होता. रिसर्चनुसार, एसएमएस रुग्णालयात आतापर्यंत 27 रुग्ण आढळून आलेत ज्यांना सर्जरीनंतर पुन्हा ब्लॅक फंगसची लागण झाली होती.
13 / 14
काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत.
14 / 14
देशातील अनेक राज्यात ब्लॅक फंगसचा हाहाकार पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना या सातत्याने करण्यात येत आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMucormycosisम्युकोरमायकोसिसIndiaभारतhospitalहॉस्पिटलResearchसंशोधन