Royal dress, sword in hand; Traditions of Jyotiraditya Shinde on the plains of Gwalior
राजेशाही पेहराव, हाती तलवार; ग्वाल्हेरच्या मैदानावर ज्योतिरादित्य शिंदेंची प्रथा-परंपरा By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 2:42 PM1 / 9विजयादशमी दसरा या सणाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. राजा-महाराजांच्या काळात दसरा सण मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात साजरा करण्यात येत होता. त्यामुळे, राजघराण्यात या सणाचं विशेष महत्त्व आहे. 2 / 9भारत देश १९४७ साली स्वातंत्र्य झाल्यानंतर देशात लोकशाही आली. राजेशाही संस्थानं खालसा करण्यात आली आणि लोकांमधून लोकप्रतिनिधी निवडून त्यांना त्या भागाचा प्रमुख बनविण्यात येऊ लागलं.मात्र, आजही दसऱ्याच्या दिवशी राजघराण्यातील कुटुंबात शाही सोहळा साजरा होतो. 3 / 9महाराष्ट्रातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले कुटुंबीयांतही दसऱ्याचा सणाला विशेष महत्त्व आहे. परंपरा जपत दोन्ही कुटुंबात दसरा साजरा होतो. 4 / 9त्याचप्रमाणे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचे राजे राहिलेल्या शिंदे कुटुंबातही यंदा राजेशाही थाटात दसरा सण साजरा करण्यात आला. सध्याचे केंद्रीयमंत्री असलेल्या ज्योतिरादित्य शिंदेंनी राजेशाही ड्रेस परिधान करुन शस्त्र हाती घेतलं होतं. 5 / 9ज्योतिरादित्य यांनी शमी वृक्षाचे पूजन केले. त्यानंतर, राजवंशाचे महाराज म्हणून शमी वृक्षाला आपल्या तलवारीच्या टोकाने स्पर्श केला. त्यानंतर, तेथील जनतेनं दसऱ्याचं सोनं लुटण्यास प्रारंभ केला. 6 / 9ग्वाल्हेरमधील शिंदे कुटुंबीयांचं कुळदेवता मांडरे ची माता येथील मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही शमी वृक्षाचे पूजन केले. यावेळी, महाराजाच्या वेशात ज्योतिरादित्य दिसून आले. तर, त्यांचे पुत्र युवराज महान आर्यमन शिंदे यांनीही वृक्षपूजा केली.7 / 9शमी वृक्षाची पूजा केल्यानंतर देशात सुख-शांती नांदो, अशी मनोकामना ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली. आपल्या तलावारीच्या टोकाने शमी वृक्षाचे पूजन होताच, उपस्थित नागरिकांना दसऱ्याचं सोनं लुटायला एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळाल. 8 / 9राजा महाराजांच्या काळात दसऱ्याच्या दिवशी राजे आपल्या सरदार आणि सैन्यांसह राजमहालातून निघत. गोरखी येथे सवारी पोहोचल्यानंतर देव दर्शन होताच शस्त्रांस्त्रांचे पूजन होत. राजघराण्यात शेकडो वर्षांची ती परंपरा आजही जपण्यात येते. 9 / 9ज्योतिरादित्य शिंदेंचा हा राजेशाही थाट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तसेच, त्यांचे या पेहरावातील फोटोही व्हायरल झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications