royal families of madhya pradesh contest in lok sabha election 2019
मध्य प्रदेशातील राजघराण्यांचे वारस, निवडणुकीच्या रिंगणात By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 5:52 PM1 / 62 / 6दिग्विजय सिंह : मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातील दिग्विजय सिंह काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाच्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आहेत. भोपाळ मतदारसंघातून पहिल्यांदाच दोघेही निवडणूक लढवत आहेत. आतापर्यंत भोपाळ भाजपाचा बालेकिल्ला समजला जात आहे. कारण, या जागेवर 1984 साली काँग्रेसचा विजय झाला होता. मात्र, त्यानंतर याठिकाणाहून भाजपाचा खासदार संसदेत गेला आहे. 3 / 6अजय सिंह : यंदाच्या निवडणुकीत अजय सिंह चुरहटमधून लढवत आहेत. माजी केंद्रीय मंत्री अर्जुन सिंह यांचा मुलगा असलेले अजय सिंह काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाच्या रीती पाठक आहेत. गेल्या निवडणुकीत सतना मतदारसंघातून अजय सिंह यांनी निवडणूक लढविली होती. 4 / 6ज्योतिरादित्य सिंधिया: सिंधिया राजघराण्याचे ज्योतिरादित्य सिंधिया अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया पाचव्यांदा गुना मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. गेल्या चार निवडणुकीत ते सलग विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधात यंदाच्या निवडणुकीत भाजपा उमेदवार के.पी.यादव रिंगणात आहेत. 5 / 6कविता सिंह : छतरपूर राजघराण्याशी संबंध असलेल्या कविता सिंह निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना खजुराहो मतदार संघातून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. कविता सिंह यांचे पती विक्रम सिंह नातीराजा राजनगर विधानसभेचे आमदार आहेत. कविता सिंह यांच्याविरोधात भाजपाचे उमेदवार व्ही.डी. शर्मा आहेत. 6 / 6हिमाद्री सिंह: शहडोल लोकसभा मतदार संघातून हिमाद्री सिंह निवडणूक लढवत आहेत. हिमाद्री सिंह यांचा गौड राजघराण्याशी संबंध आहे. त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला आहे. पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळविली. आणखी वाचा Subscribe to Notifications