Russia-Ukraine War: Air india Airlift 242 Indians from Ukraine
Russia-Ukraine War: युद्धभूमीवर १ तासाचा थरार, २४२ भारतीयांना मायदेशी आणलं; नेमकं काय घडलं? By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 12:26 PM1 / 10रशियानं यूक्रेनसोबत युद्ध पुकारलं आहे. रशियाच्या सैन्याने यूक्रेनच्या सीमेत दाखल होत हल्ला सुरु केला आहे. रशियानं यूक्रेनच्या मोठ्या शहरांवर मिसाइल हल्ले केले आहेत. यूक्रेन सीमेत नो फ्लाय झोन घोषित करण्यात आला आहे. सध्या संपूर्ण जगाचं लक्ष रशिया-यूक्रेन युद्धावर आहे.2 / 10रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी घेतलेल्या आक्रमक निर्णयानंतर जगात खळबळ माजली आहे. अशा स्थितीत भारताने यूक्रेनमधील भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाचं विमान पाठवलं आहे. हे ऑपरेशन इतकं सोप्पं नाही. कारण युद्धाच्या जागेवर भारताचं विमान उतरणार आहे.3 / 10यूक्रेनमध्ये सर्व एअरपोर्टवरील फ्लाईट रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारताचं विमान तिथे उतरणार तेव्हा त्या देशाचाही एकही स्टाफ तिथे हजर नाही. यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याचं मोठं आव्हान भारतासमोर होतं. त्यासाठी केवळ १ तासाचा अवधी होता.4 / 10मंगळवारी एअर इंडियाचं १९४७ फ्लाइट काळा समुद्र क्षेत्रातील यूक्रेनच्या एअरस्पेसमध्ये एन्ट्री करणार होतं. कीव एअर कंट्रोलनं अखेरच्या मिनिटाला विमानाच्या मार्गात बदल केला. कीवच्या बोरिस्पिल इंटरनॅशनल एअरपोर्टवर येणाऱ्या विमानांना ६०-८० नॉटिकल अंतराच्या दूर विमान मार्ग बदलण्यास सांगितले.5 / 10ATR ने भारतीय प्लेनच्या पायलटला विचारलं की, नव्या मार्गावरुन लँडिंग करण्यासाठी काही अडचण तर नाही ना? त्यावर ओके रिप्लाय देत भारतीय विमान एअरपोर्टजवळ पोहचले. सूत्रांच्या माहितीनुसार प्लेन नव्या मार्गाच्या दिशेने पुढे गेले आणि सुरक्षितपणे लँडिंग केले.6 / 10महाराजा ५ पायलटसोबत यूक्रेनच्या जमिनीवर उतरलं होतं. कारण विना वेळ घालवता पुन्हा भारताच्या दिशेने उड्डाण घ्यायचं होतं. ही वेळ आराम करण्याची नव्हती. १८ क्रू मेंबर, ३ इंजिनिअर आणि २ सुरक्षा रक्षकांना पाहताच २४२ भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. 7 / 10गेल्या अनेक तासांपासून यूक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विमानाची वाट पाहत होते. प्लेननं लँडिंग केल्यानंतर काही मिनिटांत क्रू मेंबर आणि स्टाफनं त्यांचे काम वेगाने सुरु केले. १ तासांतच पुन्हा भारतात परतायचं आहे हे सर्वांच्या डोक्यात भिनलं होतं. 8 / 10पायलटनं देखरेख सुरु केली. ज्यामुळे सामान अशाप्रकारे ठेवले जाईल ज्याने सेंटर ऑफ ग्रॅविटी तयार होईल. सुरक्षा रक्षक तपासणीसाठी सीढीवर तैनात राहिले. केबिन क्रू मेंबर्स विमानात आलेल्या प्रवासांना सीटवर बसवण्यास एकत्र झाले. वेगवेगळे निर्देश देण्यात आले. 9 / 10सूत्रांच्या माहितीनुसार, कीवमध्ये ग्राऊंड स्टाफ १ तास १०-१५ मिनिटं होता. वेळ निघून जात होता. विमानाचं उड्डाण वेळेवर होणं गरजेचे होते. मात्र पायलट, क्रू मेंबर्सच्या मदतीनं १ तासांतच यूक्रेनमधील भारतीयांना घेऊन विमान पुन्हा मायदेशी परतलं. 10 / 10विमानात बसलेल्या भारतीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही तासांत ते भारतात परतणार होते. अद्यापही काही भारतीय यूक्रेनमध्ये आहेत. काही शहरातील लोकांना बंकरमध्ये घेऊन जाण्यात आले आहेत. मेडिकल शिक्षणासाठी विद्यार्थी यूक्रेनला जात असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications