शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia Ukraine War: युक्रेनसारखी परिस्थिती ओढवल्यास भारत या क्षेपणास्त्रांसह असेल सज्ज, शत्रूची प्रत्येक चाल होईल फेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 5:39 PM

1 / 8
शहरी युद्धामध्ये छोट्या आणि मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची गरज भासते. त्यांच्या तुटवड्यामुळे युक्रेनला मोठ्या प्रमाणान नुकसानीचा सामना करावा लागला. युक्रेनला रशियाच्या हल्ल्यांना चोख उत्तर देता आलां नाही. मात्र युक्रेनसारख्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारताकडे क्षेपणास्त्रे आहेत. छोट्या आणि मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा पुरेसा साठा भारताकडे आहे. अशाच दोन क्षेपणास्त्रांची चाचणी भारताने २७ मार्च २०२२ रोजी घेतली आहे.
2 / 8
डीआरडीओने मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या MRSAM क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली आहे. या क्षेपणास्त्राने अगदी अचूकपणे आपले टार्गेट पूर्णपणे भेदले आहे. परीक्षणादरम्यान, बालासोर जिल्ह्यातील तीन गावांमधील ७ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले होते.
3 / 8
डीआरडीओने लष्करासाठी विकसित केलेल्या MRSAM क्षेपणास्त्राचे लाईव्ह फायरिंग ट्रायल घेतले. या क्षेपणास्त्राच्या मदतीने वेगात उडणाऱ्या हवाई टार्गेटला लक्ष्य करण्यात आले. या क्षेपणास्त्राने लॉन्च होताच आपल्या लक्ष्याला ओळखले आणि त्याला इंटरसेप्ट करत नष्ट केले. या क्षेपणास्त्राच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या. पहिली चाचणी मध्यम उंचीच्या लांब टप्प्याच्या टार्गेटसोबत घेण्यात आली. तर दुसरी कमी उंचीच्या कमी रेंज असलेल्या टार्गेटसोबत करण्यात आली. या दोन्ही चाचण्या यशस्वी झाल्या.
4 / 8
MRSAM क्षेपणास्त्राला डीआरडीओने इस्त्राईल एअरोस्पेस इंडस्ट्रीसोबत मिळून तयार केले आहे. या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये मल्टी फंक्शन रडार, मोबाईल लाँचर आणि अन्य सैनिकी उपकरणे आणि वाहने आहेत. इस्त्राईलकडून भारताला मिळालेली बराक क्षेपणास्त्रही MRSAM सारखीच आहे.
5 / 8
MRSAMचं वजन सुमारे २७५ किलोग्रॅम असते. त्याची लांबी ४.५ मीटर आहे. तर व्यास ०.४५ मीटर एवढा आहे. या क्षेपणास्त्रावर ६० किलोग्रॅम वॉरहेड म्हणजेच हत्यारं लोड केली जाऊ शकतात. ही दोन स्टेजमधील क्षेपणास्त्र आहेत. ती लॉन्च झाल्यानंतर धूर कमी सोडतात. एकवेळ लॉन्च झाल्यानंतर MRSAM आकाशात १६ किमीपर्यंतच्या टार्गेटला उद्ध्वस्त करू शकते. तसेच या क्षेपणास्त्राची रेंज ही ५०० मीटरपासून १०० किमीपर्यंत आहे. म्हणजेच या रेंजमध्ये येणारे शत्रूचे विमान, ड्रोन, क्षेपणास्त्र यांना ती नष्ट करू शकते.
6 / 8
MRSAM क्षेपणास्त्रामधील उल्लेखनीय बाब म्हणजे त्यात रेडियो फ्रिक्वेंसी सीकर लागलेला आहे. म्हणजेच शत्रूचं यान जर चकवा देण्यासाठी केवळ रेडियोचा वापर करत असेल. तर ही त्यालाही नष्ट करेल. याची गती ६८० मीटक प्रति सेकंद एवढी आहे. म्हणजेच २४४८ किमी प्रतितास वेगाने हे क्षेपणास्त्र मारा करू शकते. त्याची गती आणि लक्ष्याच पाठलाग करण्याची क्षमता त्याला खूप घातक बनवते.
7 / 8
भारताने इस्राइलकडून MRSAM क्षेपणास्त्राचे पाच रेजिमेंट खरेदी करण्याचा विचार केला होता. यामध्ये ४० लॉन्चर्स आणि २०० क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. या डिलची किंमत सुमारे १७ हजार कोटी रुपये एवढी आहे. या क्षेपणास्त्रांच्या तैनातीमुळे भारताला वायू सुरक्षा कवच तयार करण्यात मदत मिळेल. २०२३ पर्यंत या क्षेपणास्त्रांची तैनाती देशातील प्रमुक रणनितीक ठिकाणी होईल.
8 / 8
आयएनएस विशाखापट्टणममध्ये २३ अँटी एअर बराक क्षेपणास्त्रे तैनात केली जाऊ शकतात. त्यांची रेंज १०० किमी आहे. यामध्ये १६ अँटीशिप किंवा लँड अॅटॅक ब्राम्होस क्षेपणास्त्रेही लावली जाऊ शकतात. म्हणजेच या दोन्ही क्षेपणास्त्रांनी लेस झाल्यानंतर ही युद्धनौका शत्रूची जहाजे आणि विमानांवर तुटून पडू शकते.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धIndiaभारतDefenceसंरक्षण विभाग