भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 18:09 IST
1 / 10कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारतात रशियन कोरोना लस Sputnik V ला मंजुरी मिळाली आहे. यामुळे आता भारताला कोरोनाचा सामना करण्यासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिननंतर ही तिसरी लस उपलब्ध झाली आहे. 2 / 10देशात स्पुतनिक-V लशीचे फेज 3 ट्रायल सुरू आहे. खरे तर, रेग्युलेटरी अप्रूव्हल मिळविणारी ही जगातील पहिली लस होती. मात्र, मुबलक ट्रायल डेटा नसल्याने इतर देशांनी या लशीला फारसे महत्व दिले नाही. 3 / 10भारतात कोरोनावरील दोन लशी - Covishield आणि Covaxin ला जानेवारी 2021च्या पहिल्याच आठवड्यात अप्रूव्हल मिळले आहे. तर जाणून घेऊया, Covishield आणि Covaxin च्या तुलनेत किती प्रभावी आहे Sputnik V?4 / 10कोरोना व्हायरसवरील या तीन लशी किती आहेत प्रभावी? - फेज 3 ट्रायलच्या अंतरिम निकालात Sputnik V लशीची एफेकसी 91.6% आढळून आली आहे. भारत बायोटेकच्या Covaxin च्या फेज 3 क्लिनिकल ट्रायलमध्ये 81% एफेकसी आढळून आली. तर, सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या Covishieldमध्ये 62% एफेकसी आढळून आली आहे. मात्र, दीड डोस दिल्यानंतर ही एफेकसी 90% पर्यंत पोहोचली होती.5 / 10असा आहे डोस पॅटर्न आणि स्टोरेजची पद्धत? Covishield - Covishield चे दोन डोस 4-8 आठवड्यांच्या अंतराने दिले जातात. ही लस स्टोअर करण्यासाठी शून्याहून कमी तापमानाची आवश्यकता असते.6 / 10Covaxin - Covaxin चे दोन डोस 4-6 आठवड्याच्या अंतराने दिले जातात. ही लस 2-8 डिग्री सेल्सियस दरम्यानच्या तापमानावर स्टोअर करावी लागते.7 / 10 Sputnik V - Sputnik V च्या डेव्हलपर्सनुसार, ही लसदेखील 2-8 डिग्री सेल्सियस तापमानादरम्यान स्टोअर केली जाऊ शकते. ही लसही दोन डोसमध्येच दिली जाते.8 / 10किंमत आणि उपलब्धता - Covishield आणि Covaxin, या दोन्ही लशी सरकारी रुग्णालयांत मोफत दिल्या जात आहेत. खासगी रुग्णालयांतून ही लस घेतल्यास 250 रुपये प्रति डोस, असे शुल्क घेतले जाते. सरकार सीरम इंस्टिट्यूट आणि भारत बायोटेकला प्रति डोस 150 रुपये देत आहे.9 / 10अद्याप Sputnik V ची भारतातील किंमत स्पष्ट झालेली नाही. परदेशात ही लस 10 डॉलर प्रति डोसपेक्षा स्वस्त आहे. RDIFच्या सुरुवातीची योजना, ही लस रशियातून आयात करण्याची आहे. यामुळे या लशीची किंमत वाढू शकते.10 / 10मात्र, भारतात प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर या लशीची किंमत कमी होऊ शकते. डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजसोबत 10 कोटी डोसची डील झाली आहे. एवढेच नाही, तर RDIFने हेटरो बायोफार्मा, ग्लँड फार्मा, स्टेलिस बायोफार्मा, विक्ट्री बायोटेकसोबत 85 कोटी डोस तयार करण्याचाही करार केला आहे.