Sachin pilot is the pilot of the Congress, ending the discussion on BJP entry
सचिन हे 'काँग्रेसचेच पायलट', भाजपातील प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 10:12 PM1 / 11उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना भारतीय जनता पक्षानं काँग्रेसला जोरदार धक्का दिला. जितिन प्रसाद यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. 2 / 11राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रसाद यांनी पक्षाला रामराम केल्यानं उत्तर प्रदेशात आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेसच्या समस्यांमध्ये भर पडली आहे. 3 / 11त्यातच आता राजस्थानातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटदेखील पक्षाला रामराम करणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत, स्वत: सचिन पायलट यांनी उत्तर दिलं आहे. 4 / 11सचिन पायलट लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा रिटा बहुगुणा जोशी यांनी 'आज तक' या हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान केला. 5 / 11'पायलट लवकरच भाजपमध्ये येतील. माझं त्यांच्याशी फोनवरून बोलणं झालं आहे,' असं रिटा म्हणाल्या. काँग्रेस पक्ष आता उत्तर भारतात संपल्यात जमा असल्याचंही त्या पुढे म्हणाल्या. 6 / 11सचिन पायलट काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं समजतं. काही महिन्यांपूर्वी त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यावेळी त्यांची समजूत काढण्यात आली. मात्र, तेव्हा पायलट यांना देण्यात आलेली आश्वासनं अद्यापही पूर्ण झालेली नाहीत.7 / 11 जितिन प्रसाद यांच्या पक्षांतरानंतर अनेकांच्या नजरा सचिन पायलट यांच्यावर खिळल्या आहेत. मात्र, सचिन पालयट यांनी स्वत:च स्पष्ट शब्दात यावर भाष्य केलंय. 8 / 11मी काँग्रेसमध्ये होतो, मी काँग्रेसमध्ये आहे आणि काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं सचिन पायलट यांनी दै. भास्कर वृत्त समुहाशी बोलताना म्हटले आहे. 9 / 11 राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी काल दुपारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. 10 / 11केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं पक्षात स्वागत केलं. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जितिन प्रसाद भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. 11 / 11पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताची निर्मिती करत आहेत. या कार्यात योगदान देण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असं प्रसाद यांनी पक्षप्रवेशानंतर सांगितलं. आणखी वाचा Subscribe to Notifications