Sachin Tendulkar celebrate children day with special children
सचिन तेंडुलकरची मुलांसोबत मस्ती By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 1:59 PM1 / 9क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खेळाने करोडो भारतीयांच्या मनावर अधिराज्य करणा-या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोमवारी काही विशेष मुलांसोबत वेळ घालवला. 2 / 9युनिसेफचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर असणा-या सचिनने बालदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुलांसोबत फक्त वेळ घालवला नाही, तर क्रिकेटही खेळला. 3 / 9सचिन यावेळी मुलांसोबत 5-5 ओव्हरचा सामनाही खेळला.4 / 9यावेळी सचिनने फलंदाजी करत तीन चौकेही लगावले. चॅरिटी सामना असतानाही सचिन मात्र मुलांसोबत मन लावून खेळताना दिसला.5 / 9सचिनने मुलांना बॅटिंग आणि बॉलिंगसाठी काही टिप्सही दिल्या. मास्टर ब्लास्टरकडून प्रशिक्षण मिळतंय हे पाहून मुलंही आनंदात होती.6 / 9यावेळी सचिनने मुलांसोबत अनेक आठवणी शेअर केल्या. आपण लहान असताना क्रिकेटमुळे खूप प्रवास करायला लागायचा. सुरुवातील आई - वडिलांसोबत जायचो पण नंतर एकट्याने प्रवास करु लागलो असं सचिनने सांगितलं. 7 / 9पालकांकडून निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळाल्याने मला यश मिळालं असं सचिनने मुलांना सांगितलं. 8 / 9आपण लहानपणी खूप खोडकर होतो, पण लक्ष्य मिळवण्यासाठी आपण ते सर्व सोडलं आणि शिस्तबद्द झालो असंही सचिनने सांगितलं. 9 / 9मुलांनी मास्टर ब्लास्टरसोबत सेल्फी काढत आठवण जपून ठेवली. आणखी वाचा Subscribe to Notifications