शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aparna Yadav पासून Aditi Singh पर्यंत..., उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 'या' महिला नेत्या चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 4:29 PM

1 / 6
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (Uttar Pradesh Assembly Elections 2022) सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महिला नेत्या सतत चर्चेत येत आहेत. या महिला नेत्यांमध्ये मुलायमसिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा सिंह ते स्वामी प्रसाद मौर्य यांची कन्या संघमित्रा यांच्या नावांचा समावेश आहे.
2 / 6
संघमित्रा मौर्य जेव्हापासून त्यांचे वडील आणि माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजप सोडून सपामध्ये प्रवेश केला तेव्हापासून ते चर्चेत आहेत. तेव्हापासून संघमित्रा कदाचित भाजपचा राजीनामाही देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत असे झाले नसून तिने वडिलांविरोधात प्रचार करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.
3 / 6
अपर्णा यादव यांनी अचानक सपा सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला आणि चर्चेत आल्या. अपर्णा यादव यांना लखनऊ कँटमधून भाजपचे तिकीट मिळेल, असे म्हटले जात होते, परंतु तसे झाले नाही.
4 / 6
अदिती सिंह याही सतत चर्चेत असतात. त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे पती अंगद सैनी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसने त्यांचे तिकीट कापले. अदिती प्रियंका गांधी आणि काँग्रेसवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत.
5 / 6
या निवडणुकांमध्ये रिया शाक्य यांचे नावही खूप चर्चेत आहे. खरंतर बिधुना विधानसभा मतदारसंघातून त्या आपले वडील विनय शाक्य यांच्याविरोधात भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहे.
6 / 6
याचबरोबर, पल्लवी पटेल यांचेही नाव चर्चेत आहे. पल्लवी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याविरुद्ध सिरथू विधानसभा मतदारसंघात सपा आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. पल्लवी या केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या भगिणी आहेत.
टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Electionनिवडणूक