Sanjay Raut lashes out at Ram temple land scam, Yogis should speak ...
राम मंदिर जमीन घोटाळ्यावर संजय राऊत कडाडले, योगींनी बोलावं... By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 6:46 PM1 / 12अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर उभारणीसाठी नेमण्यात आलेल्या ट्रस्टवर मंदिरासाठी जमीन खरेदीत घोटाळ्याचा आरोप केला आहे. आम आदमी पार्टी आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन असा आरोप केला. 2 / 12जी जमीन केवळ 2 कोटी रुपयांना विकली गेली होती, ती जमीन 18.5 कोटीमध्ये विकत घेतली गेली, असा आरोप या नेत्यांनी केला आहे. त्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधींनीही टीका केली आहे. 3 / 12प्रभू श्रीराम हे स्वत: न्याय आहेत, सत्य आहेत, धर्म आहेत. त्यांच्या नावाने धोकेबाजी हा अधर्म आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. राहुल गांधींनी भाजपवर आणि श्रीराम मंदिर उभारणीत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर टीका केली आहे.4 / 12काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही श्री राम मंदिरासाठी जमा केलेल्या निधीत झालेल्या भ्रष्टाचारावरुन भाजपवर टीका केली आहे. 5 / 12कोट्यवधी लोकांनी आस्था आणि भक्तीमार्गाने परमेश्वराच्या चरणी काही दान अर्पण केलं आहे. या निधीचा दुरुपयोग अधर्म आहे, भाविकांच्या आस्थेचा हा मोठा अपमान आहे, असेही प्रियंका गांधींनी म्हटलं. 6 / 12राम मंदिर जमीन घोटाळ्याबाबत शिवसेनेनं आपली भूमिका जाहीर केली आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी जमीन खरेदी करताना झालेल्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपावरुन खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना सुनावले आहे. 7 / 12राम मंदिर ट्रस्ट आणि संबंधित नेत्यांनी आरोपावर स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. हा सर्वसामान्यांच्या आस्थेचा आणि हिंदुत्त्वादी भाजपवरील विश्वासाचा मुद्दा आहे, असेही राऊत यांनी म्हटलं. 8 / 12आपचे खासदार संजय सिंग यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांनी मला दाखवलेले पुरावे हे माझ्यासाठी धक्कादायक आहे, असेही राऊत यांनी म्हटलं आहे. 9 / 12प्रभू श्रीराम आणि राम मंदिर हा आमच्या आस्थेचा, श्रद्धेचा विषय आहे. पण, काही जणांसाठी राजकारणाचा विषय बनला आहे. मंदिर उभारणीसाठी बांधण्यात आलेल्या ट्रस्टने आरोपावर स्पष्टीकरण द्यावे, ते खरे की खोटे हे सांगावे, असे राऊत यांनी म्हटलं आहे. 10 / 12उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत हेही या मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला हजर होते. त्यामुळे, या दोन्ही नेत्यांनीही बोलायला हवं. 11 / 12राम मंदिर हे लोकांच्या श्रद्धेचा विषय असून लोकांना यासाठी निधी दिला आहे. शिवसेनेनंही 1 कोटी रुपयांची देणगी दिल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 12 / 12दरम्यान, राम मंदिर ट्रस्टचे सेक्रेटरी चंपत राय यांनी म्हटले आहे की या आरोपांमुळे कोणतीही चिंता वाटत नाही. ते म्हणाले की, आमच्यावर महात्मा गांधी यांच्या हत्येचा आरोपही करण्यात आला होता. आम्हाला अशा गोष्टींची पर्वा नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications