शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sanjay Rut: आदित्य ठाकरेंपूर्वीच संजय राऊत अयोध्येत, रामलल्लाचे घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 12:35 PM

1 / 7
मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा 5 जून रोजीचा अयोध्या दौरा प्रकृती उपचारामुळे रद्द करण्यात आला. मनसेनं या दौऱ्याची जोरदार तयारी केली होती. मात्र, युपीचे खासदार बृजभूषणसिंह यांचा वाढता विरोध आणि ऐनवेळी समोर आलेली पायावरील शस्त्रक्रियेमुळे राज यांचा दौरा स्थगित झाला.
2 / 7
आता शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा 15 जून रोजी होत आहे. याबाबत, खासदार संजय राऊत यांनी आज ट्विटवरुन माहिती दिली. जय श्री राम... असे म्हणत राऊतांनी अयोध्या दौऱ्याबाबत सांगितलं.
3 / 7
विशेष म्हणजे संजय राऊत यांनी आज अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी अयोध्येतील भेटीचे फोटोही शेअर केले आहेत.
4 / 7
आज अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले.अत्यंत सकारात्मक ऊर्जा असलेले हे तीर्थस्थान आहे. माझ्यासोबत एकनाथ शिंदे, वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण, अनिल तिवारी, जीवन कामत होते.
5 / 7
15 तारखेस अयोध्येत अदित्य ठाकरे यांचे आगमन होत.त्या सोहोळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. जय श्रीराम! असे राऊत यांनी ट्विटरवरुन म्हटले
6 / 7
अयोध्येत ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण कार्य सुरू आहे तेथे भेट दिली. महाराष्ट्राचे अनेक अभियंते निर्माण स्थळी काम करीत आहेत. हजारो कारसेवक तसेच शिवसैनिकांच्या बलिदानाचे सार्थक झाले. याचा आनंद झाला, असेही ते म्हणाले.
7 / 7
आता, आदित्य ठाकरेंचा 15 जून रोजीच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आदित्य ठाकरे हे अयोध्येला पोहचण्यापूर्वीच अयोध्येत जाऊन तेथील तयारीचा आढावा राऊत यांनी घेतला.
टॅग्स :Ayodhyaअयोध्याSanjay Rautसंजय राऊतAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना