saving account bank rule account holder can save upto 5 lakh
बँक खात्यात ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा असेल तर काय करायचं? नियम काय सांगतो वाचा... By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 1:35 PM1 / 7 तुमचेही बचत खाते (Saving Account) असेल आणि त्यात तुम्ही दर महिन्याकाठी पैसे साठवून ठेवत असाल तर ही माहिती नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरणारी आहे. तुम्ही तुमच्या बचत खात्यात किती पैसे ठेवू शकता हे तुम्हाला माहिती आहे का? बचत खात्यात पैसे ठेवण्यासाठीही मर्यादा आहे. 2 / 7पैसे जमा करून तुम्ही एका मर्यादेपेक्षा जास्त पैसे ठेवू शकत नाही. मर्यादेपेक्षा जास्त पैसे ठेवणे तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. कारण एखादी बँक बुडाली तर फक्त तुमचे ५ लाखांपर्यंतचे पैसे सुरक्षित राहतात. तुम्हाला तेवढीच रक्कम परत मिळते. 3 / 7२०२० मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२० मध्ये एक नियम बदलला होता. त्या म्हणाल्या होत्या की फक्त तुमची बँकांमध्ये ठेवलेली ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम सुरक्षित मानली जाईल. यापूर्वी ही रक्कम एक लाख रुपये होती. यापेक्षा जास्त पैसे ठेवले तर काय होईल हे समजून घेऊया?4 / 7खातेदाराचा विचार करून २०२० मध्ये मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला होता. अडचणीत असलेल्या किंवा बुडणाऱ्या बँकांच्या खातेदारांना तीन महिन्यांच्या आत म्हणजेच ९० दिवसांच्या आत ठेव विम्याचा क्लेम करता येईल, असे या नियमात म्हटले होते. 5 / 7जर एखादी बँक दिवाळखोरी किंवा स्थगिती घोषीत केली गेली असेल, तर खातेदार DICGC च्या नियमांनुसार ९० दिवसांच्या आत त्यांचे ५ लाख रुपये काढू शकतील. यासाठी सरकारने ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कायद्यात बदल केले आहेत. २०२० मध्ये, सरकारने ठेवींवर (DICGC विमा प्रीमियम) विमा संरक्षण १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये केले.6 / 7कोणत्याही बँकेतील व्यक्तीच्या सर्व खात्यांचा समावेश केल्यास पाच लाख रुपयांची हमी असते. म्हणजे जर तुम्ही त्याच बँकेत रु. ५ लाखांची FD (फिक्स्ड डिपॉझिट) केली असेल आणि त्याच खात्यात ३ लाख वाचवले असतील, तर बँक बुडाल्यास तुम्हाला फक्त ५ लाख रुपये परत मिळतील. याचा अर्थ, तुमच्या खात्यात कितीही पैसे असले तरीही, फक्त ५ लाखांपर्यंतच सुरक्षित मानले जाईल आणि तुम्हाला तेवढेच ५ लाख परत मिळतील.7 / 7गेल्या ५० वर्षांत देशात क्वचितच कोणतीही बँक दिवाळखोरीत निघाली असेल. पण तरीही तुम्ही तुमचे पैसे वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवून पैसे बुडण्याचा धोका कमी करू शकता. ठेव विमा संरक्षण १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते आगामी काळात यात आणखी वाढ होऊ शकते. तुमच्या पैशांच्या सुरक्षिततेसाठी, बँका आता जमा केलेल्या प्रत्येक १०० रुपयांवर १२ पैसे प्रीमियम भरतील. आणखी वाचा Subscribe to Notifications