शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

EPFO नंतर आता SBI चा जोरदार धक्का; महिनाभरात दोनदा व्याज कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 1:33 PM

1 / 10
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने (SBI) ग्राहकांना जोरदार दणका दिला आहे. बँकेने एकाच महिन्यात दुसऱ्यांदा रिटेल टर्म डिपॉझिट म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट (FD) वर मिळणाऱ्या व्याजामध्ये कपात केली आहे.
2 / 10
मागील आठवड्यात ईपीएफओनेही पीएफवरील व्याजदरात कपात केली होती. व्याज दर ८.६५ टक्क्यांवरुन ८.५ टक्क्यांवर आणला आहे.
3 / 10
दोन आठवड्यांपूर्वीच एसबीआयने लॉकरच्या दरामध्ये वाढ केली होती. डिपॉझिट लॉकरच्या वार्षिक शुल्कात 500 रुपयांची वाढ झाली आहे.
4 / 10
आज एफडीमध्ये दोन कोटींपेक्षा कमी रक्कम असलेल्या ठेवींवर एसबीआयने व्याज दर घटविले आहेत. नवीन दर 10 मार्च 2020 पासून लागू होणार आहेत.
5 / 10
SBI ने एमसीएलआरच्या दरांमध्येही कपात केली आहे. यामुळे कार आणि होम लोनवरील ईएमआयही कमी होणार आहे.
6 / 10
एफडीवरील नव्या दरांनुसार 7 ते 45 दिवसांच्या ठेवीवर 4 टक्के व्याज, जे आधी 4.5 टक्के होते. एक वर्ष ते पाच वर्षांपर्यंतच्या ठेवींवर 5.9 टक्के जे आधी 6 टक्के होते. 5 ते 10 वर्षांच्या अवधीच्या ठेवींवरही 5.9 टक्के व्याज देण्यात येणार आहे.
7 / 10
एसबीआयने सांगितले आहे की, हे नवे दर नवीन डिपॉझिट आणि मॅच्य़ुअर होणाऱ्या डिपॉझिटच्या नुतनीकरणावर लागू होणार आहे.
8 / 10
एसबीआयने एफडीवरील व्याजदर कपातीला सुरुवात केल्याने अन्य बँकाही त्यांचे व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे.
9 / 10
वरिष्ठ नागरिकांना एफडीवर सामान्य ग्राहकांच्या तुलनेत अर्धा टक्के जास्त व्याज देण्याची योजना सुरूच राहणार आहे.
10 / 10
SBI ने या आधी 10 फेब्रुवारीला एफडीवरील व्याजदर कमी केले होते.
टॅग्स :SBIएसबीआयBanking Sectorबँकिंग क्षेत्र