शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 5:40 PM

1 / 6
स्मार्टफोन्सच्या वाढत्या वापरासोबत व्हॉट्सॲपचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्हॉट्सॲपच्या मदतीने कुटुंबीय, मित्रपरिवार, आप्तेष्ट यांच्याशी संवाद साधण्यबरोबरच ऑफिसचीही अनेक कामं केली जातात. व्हॉट्सॲपवरून फोटो, व्हिडीओ तसेच फाईल्सही झटपट पाठवता येतात. दरम्यान, वापरण्यास सोपं असलेल्या व्हॉट्सॲपवरही स्कॅमर्सची वक्रदृष्टी पडली असून, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून होणाऱ्या स्कॅम्सचे प्रमाणत दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वत:ला या स्कॅमपासून सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं बनलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा पाच टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सॲपवर होणाऱ्या स्कॅमपासून स्वत:चा बचाव करू शकता.
2 / 6
जर तुम्हाला कुठल्याही अज्ञात नंबरवरून मेसेज आला तर तुम्ही तो ओपन करण्यापूर्वी थोडा विचार करा. खासकरून जेव्हा त्या मेसेजसोबत कुठलीही लिंक किंवा अॅटॅचमेंट असेल तेव्हा तर अधिकच खबरदारी घ्या. अशा मेसेजमध्ये अनेकदा फिशिंग लिंक असतात. त्यावर क्लिक केल्याने तुमचा डेटा चोरी होऊ शकतो.
3 / 6
ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्ड हा तुमच्या अकाउंटच्या सुरक्षिततेसाठी असतो. तो कधीही कुणासोबतही शेअर करू नका. अगदी एखाद्या बँकेच्या कर्मचाऱ्यानेही ओटीपी मागितला तरीही त्याला तो देऊ नका. त्यामाध्यमातून तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतं.
4 / 6
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे व्हॉट्सअॅप हे कायम गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून डाऊनलोड करा. कुठल्याही थर्ड पार्टी वेबसाईटवरून डाऊनलोड केलेल्या अॅपमध्ये मालवेअर असू शकतो. तो तुमचा डेटा चोरी करू शकतो.
5 / 6
टू-स्टेप व्हेरिफिकेशन एक अतिरिक्त सुरक्षा लेयर आहे जे तुमच्या व्हॉट्सअॅप अकाउंटला सुरक्षित ठेवते. त्याला सुरक्षित चालू ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन अकाउंटवर क्लिक करा.
6 / 6
जर तुम्हाला कुठला मेसेज फॉरवर्ड केला जात असेल तक त्यावर सहजपणे विश्वास ठेवू नका. नेहमी सोर्सची तपासणी करा आणि कुठल्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी दोन वेळा विचार करा.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपcyber crimeसायबर क्राइम