This School In Assam Accepts Plastic As School Fee
प्लास्टिक द्या, शिक्षण घ्या; गरिबांना मोफत शिक्षण देणारी अनोखी शाळा By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 11:04 PM1 / 7आसामच्या गुवाहाटीत मझीन मुख्तार आणि पर्मिता सर्मा चालवत असलेली अक्षर शाळा अनेक अर्थांनी अनोखी आहे. 2 / 7प्लास्टिक द्या आणि शिक्षण घ्या या तत्त्वावर ही शाळा चालते.3 / 7प्लास्टिकच्या कोणत्याही २५ वस्तू घेऊन आल्यास शाळेची संपूर्ण फी माफी केली जाते.4 / 7गरिब मुलांना शिक्षण मिळावं, त्यांचं भविष्य घडावं यासाठी मझीन मुख्तार आणि पर्मिता सर्मा यांची धडपड सुरू आहे. 5 / 7मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणारे मझीन आणि पर्मिता गोळा झालेल्या प्लास्टिकपासून विटा तयार करतात. याच विटांपासून नव्या शाळेची इमारती बांधली जात आहे. 6 / 7शाळेच्या परिसरात राहणारे लोक आधी प्लास्टिक जाळायचे. याचे तोटे मझीन मुख्तार आणि पर्मिता सर्मा यांनी लोकांना समजावून सांगितले. त्यामुळे प्लास्टिकचा प्रश्न मिटला.7 / 7मुझीन आणि पर्मिता यांनी लोकांना प्लास्टिक जमा करण्याचं आवाहन केलं. त्या बदल्यात मुलांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आणि एक अभिनव मोहीम सुरू झाली. आणखी वाचा Subscribe to Notifications