The scourge of unemployment, In Rajasthan, highly educated people are begging on the streets
बेरोजगारीचा कहर, देशात उच्चशिक्षितांवर आलीय भीक मागण्याची वेळ By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 10:12 PM1 / 9गेल्या काही वर्षांपासून असलेले मंदीचे वातावरण आणि आता कोरोना, लॉकडाऊनमुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण बेसुमार वाढले आहे. दरम्यान, देशातील एमए, एमकॉम झालेल्या उच्चशिक्षितांवरही भीक मागून उदरनिर्वाह करण्यची वेळ आली आहे. 2 / 9राजस्थान सरकारने भिकारी निर्मुलन आणि पूनर्वसन कायदा बनवला आहे. त्याअंतर्गत जयपूरमध्ये भिकाऱ्यांचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. त्यामधून ही माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील वृत्त आज तक ने प्रकाशित केले आहे. 3 / 9जयपूर शहरातील काही भिकारी हे एमए आणि एम कॉम केलेले आहेत. तर काही बीए, बीकॉम झालेले आहे, अशी माहिती सर्व्हेमधून समोर आली आहे. जर आपल्याला काम मिळाले तर आपण भीक मागणे सोडून काम करण्यास तयार असल्याचे या भिकाऱ्यांनी सांगितले. 4 / 9राजस्थानमधील गोविंदगड येथे राहणारा पवन हा एमकॉम झाल्यानंतर अजमेर रोडवर २०० फूट बायपास येथे भीक मागत आहे. काम करत असलेली कंपनी बंद झाल्यानंतर त्याने भीक मागण्यास सुरुवात केली आहे. 5 / 9 तर ३८ वर्षीय मुकेशने एमपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तो झुंझुनू जिल्ह्यातील डुंडलोद येथील राहणारा आहे. तो जयपूर शहरातील नाहरगड ठाणे क्षेत्रातील छोी चौपड येथे भीक मागून गुजराण करतो. 6 / 9याचप्रमाणे एमकॉमपर्यंत शिक्षण घेतलेले जगदीश गुप्ता, पदवीधर असलेले रमेश आणि शैलेश हेसुद्धा जयपूरमध्ये भीक मागून गुजराण करत आहेत. 7 / 9 जयपूर पोलीस आयुक्तालयांतर्गत शहरात करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये ११६२ भिकारी भीक मागताना आढळून आले. त्यापैकी ४१९ भिकाऱ्यांनी आपल्याला कुठलेही काम मिळाल्यास आपण भीक मागणे सोडणार असल्याचे सांगितले. 8 / 9मात्र ११६ भिकाऱ्यांनी त्यांना कुठल्याही प्रकारचे काम करायचे नसून केवळ भीक मागायची असल्याचे सांगितले. या सर्वेदरम्यान, काही अल्पवयीन भिकारीसुद्धा सापडले. त्यापैकी २७ जणांनी आपल्याला शिकण्याची इच्छा असल्याचे सांगितले. 9 / 9 राजस्थान सरकारने भिकारी निर्मुलन आणि पुनर्वसन कायदा नुकताच पारित केला आहे. सामाजिक संघटनांच्या मदतीने भिकाऱ्यांसाठी पुनर्वास केंद्र बनवली जात आहेत. तसेच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजस्थानला भिकारीमुक्त प्रदेश बनवण्यात येणार असल्याचे सांगितले. आणखी वाचा Subscribe to Notifications