शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...अन्यथा भारतातील ‘ही’ १२ शहरं ३ फूट समुद्राच्या पाण्याखाली जाणार; NASA चा सर्वात मोठा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 12:19 PM

1 / 11
फक्त ७९ वर्ष अन् २१०० मध्ये भारतातील १२ समुद्रकिनारी असलेले शहरं ३ फूट पाण्यात जाणार. तापमान वाढीमुळे पृथ्वीवर असणारा बर्फ वितळत आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणार आहे. त्यामुळे चेन्नई, कोच्ची, भावनगरसारख्या शहरांचा आकार लहान होणार आहे. किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी न्यावं लागेल. कारण किनाऱ्यावर ३ फूट पाणी वाढल्यानं या शहरांना मोठा धोका आहे.
2 / 11
अमेरिकन अंतराळ संस्था(NASA) नं सी लेवल प्रोजेक्शन टूल(Sea Level Projection Tool) बनवला आहे. अलीकडेच आलेल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, २१०० पर्यंत जागतिक तापमान वाढ प्रचंड होणार आहे. कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण वेळीच रोखले नाही तर तापमान सरासरी ४.४. डिग्री से. वाढ होईल. पुढील २ दशकात तापमान १.५ डिग्री से. वाढणार आहे. जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होत असेल तर साहजिकच बर्फ वितळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी मैदानी आणि समुद्रकिनारी मोठं नुकसान पोहचवणार आहे.
3 / 11
नासा प्रोजेक्शन टूलमध्ये जगभरातील नकाशा दाखवण्यात आला आहे. कोणत्या वर्षी कुठल्या भागात किती समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल. आयपीसीसी दर ५ आणि ७ वर्षांनी जगातील पर्यावरण स्थितीचा आढावा देतात. यावेळीचा रिपोर्ट खूप भयंकर आहे. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा NASA नं संपूर्ण जगात पुढील काही दशकांत वाढणाऱ्या पाणी पातळीबद्दल टूल बनवलं आहे. हा टूल जगातील त्या सर्व देशांतील समुद्राच्या पाण्याची पातळी मोजेल जिथं समुद्र किनारे आहेत.
4 / 11
भारतातील १२ शहरं २१०० पर्यंत अर्धा फूट ते तीन फूटापर्यंत समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल. सर्वात जास्त ज्या शहरांना धोका आहे त्यात भावनगर – समुद्राच्या पाणी पातळी २.६९ टक्के वाढ, कोच्ची – समुद्राच्या पाणी पातळीत २.३२ टक्क्यांनी वाढ, मोरमुगाओ इथं २.०६ पाणी पातळीत वाढ होईल.
5 / 11
त्यानंतर ओखा १.९६ फूट, तूतीकोरिन १.९३ फूट, पारादीप १.९३ फूट, मुंबई १.९० फूट, मंगळुरू १.८७ फूट, चेन्नई १.८७ फूट आणि विशाखापट्टनम १.७७ फूट. पश्चिम बंगालच्या किडरोपोर परिसरात मागील वर्षापर्यंत पाणी पातळीत वाढ होण्याचे संकेत मिळाले नाहीत. मात्र २१०० पर्यंत याठिकाणीही अर्धा फूट पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
6 / 11
पुढील १० वर्षात १२ शहरातील समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. कांडला, ओखा आणि मोरमुगाओ इथं ३.५४ इंच, भावनगर ६.२९ इंच, मुंबई ३.१४ इंच, कोच्ची ४.३३ इंच, तूतीकोरिन, चेन्नई, पारादीप आणि मंगळुरू २.७५ इंच. किडरोपोर इथं दहा वर्ष धोका नाही परंतु भविष्यात वाढत्या पाणी पातळीमुळे समुद्र किनारी फटका बसण्याची शक्यता आहे.
7 / 11
पुढील २० वर्षात जागतिक तापमानात १.५ डिग्री. से. वाढ होईल. जलवायू परिवर्तनामुळे असं झालं. IPCC च्या नवीन रिपोर्टनुसार १९५ देशातून हवामान आणि उष्णता यांच्या संबंधित आकडेवारीवरुन विश्लेषण करण्यात आलं आहे. प्रचंड उष्णता ५० वर्षातून एकदाच येते. परंतु आता दर १० वर्षांनी ते होत आहे. त्यामुळे पृथ्वीवरील तापमान उष्ण होण्याची ही सुरुवात आहे.
8 / 11
IPCC रिपोर्टनुसार, मागील ४० वर्षापासून उष्णता मोठ्या वेगाने वाढत आहे. १८५० नंतर चार दशकांमध्ये इतकी उष्णता वाढली नव्हती. प्रदुषणावर नियंत्रण न मिळवल्यास तापमान वाढ, अनियंत्रित हवामानाचा फटका बसू शकतो. या रिपोर्टमध्ये लेखक आणि ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे.
9 / 11
वैज्ञानिक फ्रेडरिको ओट्टो म्हणाले की, वारंवार तापमान वाढल्यामुळे कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया, तुर्कीच्या जंगलात आगीच्या घटनांमध्ये कमी आली नाही. जंगलात लागलेल्या आगी नियंत्रणात आणणं कठीण असतं. जर बर्फ नष्ट झाला, जंगल जळून खाक झाले तर पाणी आणि हवा यांचे संतुलन बिघडेल.
10 / 11
प्रत्येक वर्षी जगात ४ हजार कोटी टन कार्बन डाय ऑक्साइड निर्माण होतं. हे उत्सर्जन जगातील मानवांमुळे होत आहे. जर २०५० पर्यंत हे प्रमाण ५०० कोटी टन कमी केले नाही तर ते धोकादायक ठरू शकतं. परंतु वर्तमान स्थितीनुसार २०५० पर्यंत प्रदूषण, वाढते तापमान, पूर यास्थितीचा सामना दुपटीनं करावा लागू शकतो.
11 / 11
NASA चे एडमिनिस्ट्रेटर बिल नेल्सन यांनी म्हटलंय की, सी लेवल प्रोजेक्शन टूल जगातील नेते, वैज्ञानिकांना दाखवण्यासाठी स्पष्ट आहे की पुढील काही काळात आपल्या देशातील जमिन क्षेत्रफळ कमी होईल आणि समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होईल. ते सांभाळणं आपल्यासाठी खूप जड जाईल. पर्यावरणाला लक्षात ठेऊन विकास करायला हवा अन्यथा अनेक शहरं समुद्राखाली जातील.
टॅग्स :NASAनासाweatherहवामान