शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्टॅच्यू ऑफ युनिटी ते साबरमतीपर्यंत सी-प्लेन सेवा; नरेंद्र मोदी करणार उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 4:33 PM

1 / 8
गुजरातला ३१ ऑक्टोबरला नवीन भेट मिळणार आहे. अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट आणि केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी दरम्यान सी-प्लेन सेवा सुरू होणार आहे.
2 / 8
या सी-प्लेन सेवेचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी हे सी-प्लेनमधून स्टॅच्यू ऑफ युनिटी ते साबरमती रिव्हरफ्रंटपर्यंत प्रवास करतील.
3 / 8
३० ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी जंगल सफारी पार्क, क्रूझ बोट, भारत भवन, एकता नर्सरी, चिल्ड्रन पार्कचे उद्घाटन करतील.
4 / 8
३१ ऑक्टोबर रोजी आरोग्य वनचे उद्धाटन करतील आणि नवीन आयएएस अधिकाऱ्यांना संबोधित करणार आहे. यानंतर सी प्लेन येथून अहमदाबादला रवाना होतील.
5 / 8
३१ ऑक्टोबरपासून १९ सीटर सी-प्लेन दररोज ४ उड्डाण करणार आहे. यासाठी प्रति व्यक्ती ४८०० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. सी-प्लेन सरदार सरोवर धरणाच्या तलावा क्रमांक-३ मध्ये उतरेल.
6 / 8
सी-प्लेन प्रकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टमधील असल्याचे म्हटले जाते. सी-प्लेनची सुरुवात पंतप्रधानांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान केली होती, मात्र आता याला स्टॅच्यू ऑफ युनिटीशी जोडले गेले आहे.
7 / 8
दरम्यान, हे सी-प्लेन गेल्या काही दिवसांपूर्वी मालदीवहून कोचीला पोहोचले होते. आता ते गुजरातमध्ये आले आहे. या सी-प्लेनची सुरुवातीला सेवा केवडिया ते अहमदाबाद दरम्यान राहील.
8 / 8
गेल्या काही दिवसांपासून अहमदाबाद आणि केवडिया येथे सी-प्लेनसाठी जेट्टी बांधण्याचे काम चालू होते आणि इतर सर्व कामांचीही तयारी सुरू होती.
टॅग्स :Statue Of Unityस्टॅच्यू ऑफ युनिटीNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात