रेल्वे प्रवाशांना मिळणार अतिरिक्त 5 टक्के बोनस, कसं ते पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 7:03 PM
1 / 5 रेल्वे प्रवास विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठीच आहे. सामान्य तिकीट विक्रीची संख्या एक्सप्रेस तिकीट विक्रीपेक्षा अधिक आहे. रेल्वेचं तिकीट काढण्याच्या रांगेत तासनतास ताटकळत उभं राहायला लागत होते 2 / 5 मात्र रेल्वेकडून आलेल्या युटीएस अॅप्लिकेशनमुळे रेल्वे प्रवाशांचा रांगेत उभं राहण्याचा त्रास वाचला. युटीएस अॅप वापरणाऱ्यांची संख्या वाढावी या उद्देशाने रेल्वेकडून वॉलेट रिचार्जवर 5 टक्के अतिरिक्त बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 3 / 5 दररोज सकाळी तिकिटासाठी रांगेतल्या गर्दीमध्ये उभे रहावे लागते. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही वर्षापूर्वी डिजिटल पद्धतीने तिकिट काढण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करुन दिली आहे. 4 / 5 त्यामुळे आता आर वॉलेट रिचार्ज असणाऱ्या तिकिटांवर पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून 5 टक्के अतिरिक्त बोनस मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा अॅप मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड करुन मोबाईल नंबर रजिस्टर करणे बंधनकारक असते. यानंतर डिजिटल स्वरुपात तिकीट वैध ठरली जाते. 5 / 5 या सेवेसाठी प्रशासनाकडून सहा महिन्यांची मुदत देण्यात आली असून 24 ऑगस्ट पर्यंत वॉलेट रिजार्चवर बोनस देण्यात येणार आहे. तर लोकल तिकिटासाठी स्मार्ट कार्ड. एटीव्हीएम आणि जेटीबीएससाठी सुद्धा ही सुविधा लागू करण्यात आली आहे. आणखी वाचा