शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Seema Haider : सीमा हैदर करणार बॉलिवूडमध्ये एंट्री! हिरोईन बनण्याची ऑफर; 'या' चित्रपटात करू शकते काम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 11:00 AM

1 / 14
आपल्या प्रेमाचा शोध घेण्यासाठी व्हिसा आणि पासपोर्टशिवाय पाकिस्तानातून भारतात पोहोचलेली सीमा हैदर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. सीमाबाबत विविध दावे करण्यात आले. मात्र, या सगळ्यांमधून सीमा हैदरबाबत आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
2 / 14
सीमा हैदर बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असून तिला चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वी सचिन आणि सीमा यांच्या कुटुंबीयांनी सांगितले होते की, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य कामावर जात नाही. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.
3 / 14
घरातील रेशन संपलं आहे. खाद्यपदार्थांचा आणि इतर सामानाचा तुटवडा निर्माण झाला आहे.. ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. उत्तर प्रदेशच्या नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी यांना याची माहिती मिळताच त्यांनी सीमा आणि सचिनच्या कुटुंबीयांना मदतीचा हात पुढे केला.
4 / 14
अमित जानी यांनी सीमा आणि सचिन यांना त्यांच्या फिल्म प्रोडक्शन हाऊस 'जानी फायर फॉक्स' च्या बॅनरखाली बनवल्या जाणाऱ्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे. अमित जानी यांनी नुकतेच मुंबईत त्यांचे फिल्म प्रोडक्शन हाऊस तयार केले आहे.
5 / 14
सध्या अमित जानी उदयपूरमधील टेलर कन्हैया लाल साहूच्या हत्येवर चित्रपट बनवणार आहेत. कन्हैया लाल साहूच्या हत्येवर अमित जानी यांच्या वतीने बनवण्यात आलेल्या या चित्रपटाला 'अ टेलर मर्डर स्टोरी' असे नाव देण्यात आले आहे. या चित्रपटाची रिलीज डेट नोव्हेंबर आहे.
6 / 14
सीमा हैदर आणि सचिन मीणा यांना हवं असल्यास त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करण्याची ऑफर दिली आहे. कामाच्या बदल्यात ते जोडप्याला पैसेही देतील. त्यामुळे सचिनच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारू शकते. अमित जानी यांनी एका व्हिडिओमध्ये ही ऑफर जारी केली आहे.
7 / 14
व्हिडीओमध्ये अमित जानी म्हणाले की, सीमा हैदर ज्या प्रकारे भारतात दाखल झाली त्यामुळे संपूर्ण भारत संतप्त आहे. मी त्याला विरोधही केला. पण आता त्यांच्या घरात अन्न नसल्याच्या बातम्या माध्यमांतून समोर येत आहेत, तेव्हा त्यांना मदत करणे भारतीय म्हणून आपले कर्तव्य आहे.
8 / 14
ते पुढे म्हणाले की, अशा परिस्थितीत मी खूप विचार करून निर्णय घेतला आहे की ती आमच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनत असलेल्या चित्रपटात ती काम करू शकते, ज्याचे नाव आहे 'जानी फायर फॉक्स'. या चित्रपटाचा टीझरही लाँच झाला आहे. सीमाला तिच्या कामाचा मोबदलाही आम्ही देऊ.
9 / 14
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर अमित जानी म्हणतात की त्यांनी सीमाच्या घरी त्यांच्या एका सहकाऱ्यामार्फत चित्रपटात काम करण्याची ऑफर पाठवली आहे. यावर सीमाने आता विचार केल्यानंतर सांगेन, असे उत्तर दिले आहे. मात्र सीमाचे कोणतेही उत्तर अमित जानीपर्यंत पोहोचलेले नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
10 / 14
पाकिस्तानातून भारतात पळून आलेल्या सीमा हैदर आणि तिचा प्रियकर सचिन मीणा सध्या रबुपुरा येथील दुसऱ्या घरात राहत आहेत. याच दरम्यान सीमा-सचिन आणि सचिनच्या वडिलांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये सचिनच्या वडिलांनी सांगितले की, 'पोलीस केसमुळे संपूर्ण कुटुंब घरीच आहे. त्यांना बाहेर पडताही येत नाही.'
11 / 14
'घरची परिस्थिती ठीक नाही. खाण्यापिण्याची खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे.' सचिनचे वडील नेत्रपाल म्हणाले, 'आम्ही रोज कमावून खाणारी लोकं आहोत. मात्र जेव्हापासून पोलिसांनी त्यांना घराबाहेर न पडण्यास सांगितले, तेव्हापासून ते काहीच कमवू शकलेले नाहीत. दिवसभर फक्त घरीच राहा. खाण्यापिण्याचे हाल झाले आहेत.'
12 / 14
घरात रेशनही शिल्लक नाही. यासाठी आम्ही स्थानिक एसएचओला पत्रही लिहिले आहे. जेणेकरून ते आमचा मुद्दा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतील.' काहीतरी तोडगा काढावा, असे आवाहन नेत्रपाल यांनी माध्यमांच्या माध्यमातून केले. सीमा हैदर प्रकरणी अलीकडेच दोघांना अटक करण्यात आली आहे.
13 / 14
दोन्ही तरुण सचिन मीणा यांचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. बनावट आधार कार्ड बनवल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 15 बनावट आधार कार्डेही जप्त केली आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून आधार कार्ड बनवण्याचे उपकरणही जप्त केले आहे. सचिनच्या सांगण्यावरून ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
14 / 14
दोन्ही तरुण सचिन मीणा यांचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. बनावट आधार कार्ड बनवल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 15 बनावट आधार कार्डेही जप्त केली आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून आधार कार्ड बनवण्याचे उपकरणही जप्त केले आहे. सचिनच्या सांगण्यावरून ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानbollywoodबॉलिवूड