Shankaracharya Jayendra Saraswati passed away of Kanchi Kamkoti Peetha
कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं निधन By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 10:00 PM1 / 4चेन्नई : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे बुधवारी सकाळी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.2 / 4कामकोटी पीठाचे ते 69 वे शंकराचार्य होते. गुरुवारी सकाळी आठ वाजता जयेंद्र सरस्वती यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. जयेंद्र सरस्वतींचे मूळ नाव सुब्रमण्यन महादेव अय्यर होते. 3 / 4तिरुवरुर जिल्ह्यातील इरुलनीकी गावात 1935 साली त्यांचा जन्म झाला. मठाचे 68 वे शंकराचार्य चंद्रशेखरेंन्द्र सरस्वती यांनी 22 मार्च 1954 साली सुब्रमण्यन यांना कांची मठाच्या पीठाधीपती पदावर नियुक्त केले.4 / 4दरम्यान, शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक जण उपस्थित होते. आणखी वाचा Subscribe to Notifications