Sharad Pawar's wealth increased in last 6 years only 6 millions MMG
शरद पवारांची संपत्ती किती?, 6 वर्षातील वाढ पाहून आश्चर्यचकित व्हाल By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 4:57 PM1 / 10राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा उमेदवारी अर्ज दाखल करताना, आपल्या संपत्तीचं विवरणपत्रही त्यांनी जोडलंय. 2 / 10शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत त्यांनी आपल्या संपत्तीचीही माहिती दिली आहे. 3 / 10शरद पवार यांची संपत्ती गेल्या 6 वर्षात 60 लाख रुपयांनी वाढली आहे. त्यांनी दाखल केलेल्या संपत्ती विवरण पत्रानुसार शरद पवार यांची संपत्ती 32.73 कोटी रुपये एवढी आहे4 / 10सन 2014 च्या राज्यसभा निवडणुकांवेळी शरद पवार यांची एकूण संपत्ती 32.13 कोटी एवढी होती. त्यामध्ये जंगम मालमत्ता 20 कोटी 47 लाख 99 हजार 970.41 रुपये एवढी होती5 / 10. तर, स्थावर मालमत्ता 11 कोटी 65 लाख 16 हजार 290 रुपये एवढी होती. 6 / 10आता, बुधवारी त्यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 7 / 10शपथपत्रातील संपत्ती विवरणानुसार शरद पवार यांची एकूण संपत्ती 72.73 कोटी एवढी आहे. 8 / 10त्यामध्ये, जंगम संपत्ती 25 कोटी 21 लाख 33 हजार 329 रुपये एवढी आहे. तर स्थावर मालमत्ता 7 कोटी 52 लाख 33 हजार 941 रुपये एवढी आहे.9 / 10. शरद पवार यांनी 1 कोटी रुपयांचे कर्जही आहे. तर, पत्नी प्रतिभा पवार यांना अॅडव्हान्स डिपॉझिट म्हणून 50 लाख रुपये मिळाल्याचेही या शपथपत्रात सांगण्यात आले आहे. 10 / 10यावरुन, गेल्या 6 वर्षांमध्ये शरद पवार यांच्या संपत्तीत जवळपास 60 लाख रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते. 6 वर्षात 60 लाख रुपये म्हणजे आश्चर्य वाटेल का नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications