शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ती सारथी, तीच सोबती, 'वसई ते वडोदरा' तिनेच चालवली मालगाडी

By महेश गलांडे | Published: January 07, 2021 2:02 PM

1 / 9
पश्चिम रेल्वे लाईनवर प्रथमच संपूर्ण महिला स्टाफने रेल्वे मालगाडी चालवली आहे. वसई ते वडोदरा या मार्गावर ही पूर्णपणे महिलांच्या क्रु मेंबर्सने रेल्वे गाडी चालवली.
2 / 9
महिला सशक्तीकरणाचे हे उत्तम उदाहरण असून केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली. तसेच, हा अभिमानास्पद प्रवास असल्याचंही पियुष गोयल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलंय.
3 / 9
पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी या महत्त्वपूर्ण यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच, पश्चिम रेल्वेसाठी हा यादगार दिन असल्याच प्रतिक्रिया त्यांनी दिली.
4 / 9
या क्रु मेंबर्स महिला कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, त्यांनी इतर महिलांसाठी प्रेरणादायी काम केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यांची इच्छाशक्ती आणि दृढसंकल्पाचेही कंसल यांनी कौतुक केले.
5 / 9
5 जानेवारी 2021 रोजी वसई रोड ते वडोदरा या मार्गावरील मालगाडीच्या लोको पायलट म्हणून कुमकूम सुरज डोंगरे तर सहायक लोको पायलट म्हणून उदिता वर्मा यांनी जबाबदारी सांभाळली.
6 / 9
मालगाडीच्या या प्रवासात गुड्स गार्ड म्हणून आकांक्षा राय यांनी आपल्या टीम सोबत काम केलं. संपूर्ण महिला टीमने गाडीचा हा पहिलाच प्रवास असल्याचं नमूद करताना पश्चिम रेल्वेला अभिमान असल्याचं सांगण्यात आलंय.
7 / 9
महिला आणि पुरुष यांच्यातील समानता दर्शवणारी ही घटना असून पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करु शकतात. महिला कुठेच कमी नसल्याचं या प्रवासातून सिद्ध झालंय.
8 / 9
यापूर्वी महिलांनी लडाऊ विमानही उडवली आहेत, तर दुचाकींपासून ते चारचाकी, ट्रॅक्टर, बैलगाडी ते रेल्वे आणि आता रेल्वेगाडीही चालविण्याचं धाडसी काम केलंय.
9 / 9
भाजपा नेते चंद्रकात पाटील यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यांसदर्भाती माहिती शेअर करत, या मुलींचा अभिमान वाटतो, असे म्हटलंय.
टॅग्स :Mumbaiमुंबईrailwayरेल्वेWomenमहिलाpiyush goyalपीयुष गोयल