शिवसेनेमधून झाली होती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 6:50 PM
1 / 4 सध्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या राजकीय कारकीर्दीला शिवसेनेपासून सुरुवात झाली. 1996 साली ते सर्वप्रथम शिवसेनेच्या तिकीटावर राजापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून लोकसभेवर गेले. 2 / 4 माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात सुरेश प्रभू यांनी महत्वाच्या खात्याची मंत्रिपदे भूषवली. ते चारवेळा लोकसभेवर निवडून गेले. 3 / 4 9 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांनी शिवसेना सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. 4 / 4 मागच्या आठवडयाभरात कैफीयत आणि उत्कल या दोन एक्सप्रेसचे अपघात झाल्याने सुरेश प्रभूंनी आपला राजीनामा सादर केला आहे. आणखी वाचा