शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shivsena: शिवसेनेआधी 'धनुष्यबाण' कोणाचा? परभणीच्या खासदाराने सांगितला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 3:56 PM

1 / 9
शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देणार हा जिल्हा आहे. त्यामुळे, परभणी जिल्ह्यातूनच शिवसेनेला घातपात व्हावा, अशी कृती आमच्याकडून, परभणीकरांनाकडू होणार नाही, हे आपणास अभिमानाने सांगतो, असे परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी म्हटले.
2 / 9
मी अध्यात्मावर विश्वास ठेवणारा माणूस आहे, त्यामुळे आपल्याला किती हव्यास असावा हेही ठरवायला हवं. माणसानं कुठं थांबावं हेही माणसाला कळायला हवं.
3 / 9
राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना जर आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल तर आपण नेते कसे, असा सवाल बंडू जाधव यांनी उपस्थित केला. मीही नाराज होतो, पण माझ्या कामामुळे त्रस्त झाल्यानंतर ते काम मी पक्षप्रमुखांकडे सांगितलं.
4 / 9
घरात एखादा व्यक्ती कारभारी म्हणून काम पाहतो, तेव्हा तो घरातील सगळ्यांनाच समाधानी ठेऊ शकत नाही. मग, हा तर राजकीय पक्ष आहे. एवढा मोठा गाडा हाकायचा म्हटल्यावर कमी-जास्त होणारच. हे सहन करायची मानसिकता ठेवायला हवीच.
5 / 9
मी सगळ्या खासदारांना विनंती करतो, ज्या बाळासाहेबांमुळे आपण नावारुपाला आलोत, त्या वटवृक्षाच्या मुळावर घाव घालण्याचं काम आपण करू नये. आपले रुसवे फुगवे बाजूला ठेवून कुठेतरी हे थांबलं पाहिजे, असेही बंडू जाधव यांनी म्हटलं.
6 / 9
1989 साली शिवसेनेनं राज्यात लोकसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळेस परभणीचे शिवसेनेचे उमेदवार होते, कै. अशोकराव देशमुख. त्यांना निवडणुकीचं चिन्ह मिळालं होतं धनुष्यबाण.
7 / 9
संभाजीनगरला मोरेश्वार साळवे हे उमेदवार होते, त्यांना मशाल हे चिन्ह मिळाले होते. त्यावेळी, शिवसेना पक्षाला अधिकृत चिन्ह मिळालं नव्हतं. या विजयाच्या मतावर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हे कायम झालं.
8 / 9
1990 साली विधानसभेच्या निवडणुका शिवसेनेनं धनुष्यबाण या चिन्हावर लढवल्या. त्यावेळी, 1990 साली 42 आमदार शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आले.
9 / 9
त्यामुळे, शिवसेनेला धनुष्यबाण शिवसेनेनेच दिला आहे. म्हणून, परभणीकर शिवसेनेसोबतच राहणार असल्याचं खासदार बंडू जाधव यांनी इतिहासाचा दाखला देत स्पष्ट केलं.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMember of parliamentखासदारEknath Shindeएकनाथ शिंदेparabhaniपरभणी