Shoot to kill! One bullet kills; Indian army will get a dangerous Sig 716 American rifle
शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 8:19 PM1 / 10लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चीनसोबतच्या तणावामुळे भारतीय सैन्य आपली ताकद वाढवत आहे. रशियाकडून लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रविरोधी S400 मागविलेले असताना आता अमेरिकेकडून 72 हजार अमेरिकन असॉल्ट रायफल खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रायफल एवढी खतरनाक आहे की, तिला शूट टू किल असेच म्हटले जाते. 2 / 10भारतीय जवानांना आधीच 72000 रायफल मिळाल्या आहेत. त्यानंतर आणखी 72000 रायफल मागविण्यात आल्या आहेत. या रायफलचा वापर उत्तरेकडे आणि चकमकी सुरु असलेल्या ठिकाणी करण्यात येत आहे. 3 / 10या रायफलची सर्वात महत्वाची बाब म्हणजे या रायफलमधून झाडलेली गोळी ही तब्बल 500 मीटर मारा करते. 7.62 मीमी बोरची ही रायफल आहे. अन्य दुसऱ्या बंदुकांच्या तुलनेत या बंदुकीची गोळी मोठी आणि जास्त घातक असते. 4 / 10या बंदुकीतून लावलेला निशाना एकदम अचूक असतो. यामुळे एकाच गोळीने दुश्मनाला यमसदनी पाठविण्याची क्षमता ही रायफल ठेवते. यामुळेच तिला शूट टू किल रायफल म्हटले जाते. 5 / 10सैन्य दलाला शस्त्रे खरेदी करण्यासाठी जे बजेट मिळाले आहे त्यानुसार आम्ही 72 हजार अमेरिकी असॉल्ट रायफल खरेदी करत आहोत. यामुळे जवानांची ताकद वाढणार आहे, असे सैन्याच्या सूत्रांनी सांगितले. 6 / 10Sig 716 असॉल्ट रायफल भारतीय लष्काराला मिळाल्या आहेत. ही दुसरी ऑर्डर आहे. या रायफलींचा वापर दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी केला जात आहे. यामुळे दहशतवादाविरोधात सैन्याला मोठी ताकद मिळाली आहे. यासाठी 72000 रायफल खरेदीसाठी 700 कोटींचा करार करण्यात आला होता. 7 / 10या नव्या रायफली भारतीय जवान वापरत असलेल्या इंसास या रायफलींची जागा घेणार आहेत. इंसास रायफली या भारतीय सैन्याच्या ऑर्डिनंन्स फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली होती. 8 / 10योजनेनुसार अमेरिकेकडून जवळपास दीड लाख Sig 716 असॉल्ट रायफल घेतल्या जाणार आहेत. याचा वापर पाकिस्तानी सीमेवर करण्यात येणार आहे. यामुळे दहशतवाद्यांशी लढण्यास मदत मिळेल. 9 / 10तर चीनच्या सीमेसह अन्य ठिकाणी एके 203 रायफल वापरली जाणार आहे. या रायफल अमेठीमध्ये रशियाच्या सहकार्याने बनविल्या जात आहेत. 10 / 10भारतीय सैन्यदल गेल्या काही वर्षांपासून इंसास रायफल बदलण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, काही ना काही कारणाने हे रखडले होते. एलएमजीच्या तुटवड्यामुळे संरक्षण मंत्रालयाने इस्त्रायलला 16 हजार लाईट मशीन गनची ऑर्डर दिली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications