शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नोकरी सोडल्यानंतर बँकेचे सॅलरी अकाऊंट बंद करावे का? वाचा फायदा-तोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 7:30 PM

1 / 7
एखाद्या कंपनीमध्ये नोकरीला लागल्यानंतर तेथील वेतन मिळण्यासाठी त्यांच्याशी करार असलेल्या बँकेत सॅलरी अकाऊंट खोलावे लागते. या खात्याला किमान रक्कम ठेवावी लागत नाही. म्हणजेच ते झीरो बॅलन्स अकाऊंट असते. जर कोणताही कर्मचारी ती कंपनी सोडत असेल तर त्याला मिळणारे फायदेही बंद केले जातात. हे अकाऊंट सामान्य वर्गात जाते.
2 / 7
यानंतर त्या खात्यात किमान रक्कम ठेवावी लागते आणि एटीएम, चेकबुकची फीही कापली जाते. यामुळे हे खाते बंद करणेच गरजेचे असते. यामागे अन्य कारणेही आहेत.
3 / 7
नवीन नोकरी लागल्यावर नवीन सॅलरी अकाऊंट सुरु करावे लागते. जर नव्या कंपनीचे त्याच बँकेशी करार असल्यास नवीन खाते उघडण्याऎवजी जुनेच खाते सुरु ठेवावे. त्याची माहिती कंपनीला द्यावी.
4 / 7
नव्या कंपनीच्या सॅलरी अकाऊंटसह तुम्ही जुन्या खात्याचा वापर सेव्हिंग अकाऊंट म्हणूनही करू शकता. या खात्याला सेव्हिंग अकाऊंट च्या सर्व सुविधा मिळू शकतात.
5 / 7
सॅलरी अकाऊंट असल्यावर डेबिट कार्डवरही अनेक ऑफर्स दिल्या जातात. जसे की सिनेमा तिकीटवर सूट, जेवणावर सूट, कॅशबॅक, प्रवास, इंधन यावर सूट दिली जाते. यामुळे जर ऑनलाईन स्टोअरवर जास्त सूट देणारे कार्ड असेल तर ते सेव्हिंगमध्ये परिवर्तित केल्यास फायद्याचे ठरते.
6 / 7
जादातर सेव्हिंग अकाऊंटमध्ये मिनिमम अॅव्हरेज बॅलन्स ठेवण्याची गरज असते. जर ठेवले नसल्यास दंड आकारला जातो. याशिवाय मिनिमम अॅव्हरेज बॅलन्सन राखल्याबद्दल काही मोफत ट्रान्झेक्शन आणि सर्व्हिसवर पैसे आकारले जातात. सॅलरी अकाऊंटला सेव्हिंग अकाऊंटमध्ये बदलताना हा विचार जरूर करावा.
7 / 7
नवीन अकाऊंट उघडताना फॉर्म भरतेवेळी त्या अकाऊंटरच्या ट्रान्झेक्शनचे चार्ज किती आहेत हे पाहिले जात नाहीत. काही देवाण-घेवाणीवर पैसे आकारले जातात. तर अनेक बँकांमध्ये ही सुविधा मोफत असते.
टॅग्स :bankबँक