शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दृष्यमच नाही, आफताबने हॉलीवुड स्टार जॉनी डेप वि. अम्बर हर्डच्याही खटल्याचा अभ्यास केलेला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 4:48 PM

1 / 7
लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकर हिच्या हत्येप्रकरणी आफताबकडून मोठी तयारी करण्यात आली होती. सायकोलॉजिस्ट तरुणीला जाळ्यात ओढणे, दृष्यम मुव्ही पाहणे आदी अनेक प्रकारची तयारी आफताबने करून ठेवली होती. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप आणि त्याची अभिनेत्री पत्नी अम्बर हर्डच्याही खटल्याचा अभ्यास त्याने केला होता.
2 / 7
अम्बर हर्डने डेपवर मारहाण, उत्पिडन, विकृत पद्धतीने लैंगिक शोषण आदींचे आरोप केले होते. परंतू, या खटल्यात हर्डला पराभव पत्करावा लागला होता. श्रद्धाची हत्या झाल्यानंतर जूनमध्येच तिचा हा खटला सुरु होता. जगातील अत्यंत महागड्या प्रकरणात या खटल्याचा समावेश होतो.
3 / 7
श्रद्धा, आफताबमध्ये देखील हेच प्रकार सुरु होते. यामुळे आफताबने साधर्म्य पाहून जॉनी डेप या खटल्यातून कसा सुटला, त्याच्या वकिलांनी काय युक्तीवाद केला, कोणते पुरावे कोर्टासमोर ठेवले याचा पुरेपूर अभ्यास आफताबने केल्याचे समोर आले आहे.
4 / 7
हा सर्व खटला आफताबने लाईव्ह पाहिला होता. तेव्हा त्याने श्रद्धाची मर्डर केली होती. या लाईव्हमधील कायदेशीर डावपेच आफताबने आत्मसात केले होते. याच जोरावर तो मुंबई पोलिसांना एवढे दिवस चकमा देत राहिला होता.
5 / 7
पोलीस सुत्रांनुसार आफताब पुनावालाच्या इंटरनेट हिस्ट्रीच्या तपासात श्रद्धाच्या खुनाच्या काही दिवस नंतर जूनमध्ये लढविला गेलेला हा महागडा खटला आफताबने अनेकदा पाहिला होता. याद्वारे त्याने केसशी संबंधीत बारकाव्यांवर अभ्यास केला आणि पोलिसांसोबत त्याप्रमाणे वागत गेला. मुंबई पोलीसांनी जेव्हा आफताबची श्रद्धा मिसिंग प्रकरणात चौकशी केली तेव्हा देखील तो पोलिसांना फसविण्यात यशस्वी ठरला.
6 / 7
मुंबई पोलिसांना त्याने श्रद्धा त्याला सोडून निघून गेल्याचे म्हटले होते. त्याच्या म्हणण्यावर मुंबई पोलिसांनी विश्वास ठेवला आणि आफताबला सोडल्याचे या सूत्रांनी सांगितले. दिल्ली पोलिसांनी देखील आफताबची अनेकदा चौकशी केली होती. त्यांनादेखील आजवर आफताब फसवतच आला आहे.
7 / 7
आफताबने दृष्य़म मुव्ही पाहिली होती. त्यातही मर्डर मिस्ट्री होती. यामुळे पोलिसांनी त्याची इंटरनेट हिस्ट्री शोधली तेव्हा पोलिसांना हे हॉलिवूड कनेक्शन सापडले. त्यातही त्याने अनेकदा तो खटला पाहिल्याने संशय बळावला होता. डेप आणि हर्ड यांचा वाद खूप जुना होता, परंतू त्याविरोधात डेपने मानहानीच्या दावा दाखल केला होता. त्याने तो दावा जिंकला होता, हर्डला याबदल्यात मोठी रक्कम चुकवावी लागली होती.
टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर