शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 14:07 IST

1 / 6
पृथ्वीवरील नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील आघाडीचे पर्यटक केंद्र असलेले पहलगाम मंगळवारी एके-४७ मधून निघालेल्या गोळ्यांच्या तडतडाटाने हादलले. येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सुमारे २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. आता या हल्ल्यानंतर एरवी पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाणाऱ्या पहलगाममध्ये भयाण शांतता पसरली आहे.
2 / 6
या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराने मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र पहलगाममधील बेसरनच्या निसर्गरम्य परिसरात आज भीषण चित्र दिसत आहे. घटनास्थळी पर्यटकांच्या विखुरलेल्या वस्तू, इतर सामान आणि रक्ताचे शिंतोडे दिसत आहेत. पर्यटकांना येथे घेऊन येणारे घोडेही भीतीने सैरावैरा पळताना दिसत आहेत.
3 / 6
पर्यटक आणि प्रवाशांच्या गर्दीने फुलून जाणाऱ्या पहलगाममधील बाजारांमध्ये आज शुकशुकाट दिसून येत आहे. हॉटेलचे रिसेप्शन ओस पडले आहेत. तर रेस्टॉरंट आणि अनेक दुकानं बंद आहेत.
4 / 6
बेसरनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर लष्कर आणि पोलिसांच्या वाहनांची वर्दळ आहे. दर ५०० किमी अंतरावर जवानांना तैनात करण्यात आलं आहे. एरवी दिसणारे पर्यटक गायब आहेत. तर आकाशातून हेलिकॉप्टर घिरट्या घातल आहेत.
5 / 6
दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या अनेक पर्यटकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर जखमींची विचारपूस केली आहे. तसेच मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.
6 / 6
या हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आम्हाला वाटलं होतं की काश्मीरमधील परिस्थिती सुधरत आहे.. मात्र या हल्ल्याने सारं काही खोटं ठरवलंय, अशी प्रतिक्रिया एका पर्यटकाने व्यक्त केली आहे.
टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवानAmit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीर