Sikkim Airport Highlights PM Inaugurates Airport In Pakyong
निसर्गाच्या कुशीत वसलेलं सिक्कीम एअरपोर्ट; मन होईल प्रसन्न By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 5:52 PM1 / 8पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण केलं आहे. 2 / 8सिक्किमवासीयांचं विमानतळाचं स्वप्न आज साकार झालं आहे.3 / 8 2009 मध्ये या विमानतळाचं काम सुरू झालं. या विमानतळाचं बांधकाम पूर्ण होण्यास 9 वर्षांचा कालावधी लागला. 4 / 8सिक्कीममधील पहिलं विमानतळ राजधानी गंगटोकपासून 33 किलोमीटर अंतरावर आहे. हे विमानतळ 201 एकरवर पसरलेलं आहे. 5 / 8 समुद्रसपाटीपासून 4 हजार 500 फूटांवर पाकयोंग गावापासून दोन किलोमीटर उंचीवर असलेल्या एका डोंगरावर हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. 6 / 8रविवारी संध्याकाळी मोदी सिक्किममध्ये पोहोचले. सिक्कीमला जात असताना त्यांनी विमानातून टिपलेले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. 7 / 8पाकयोंग विमानतळामुळे आता सिक्कीम हवाई वाहतुकीच्या नकाशावर आलं आहे. 8 / 8 एएआयनं या विमानतळाची उभारणी केली आहे. या विमानाचं भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications