शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सहा मित्र नदी किनारी करत होते खोदकाम, तिथे सापडलं असं काही, पाहताच झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 1:08 PM

1 / 6
मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या राहतगड येथील बनेनी घाटामध्ये १०८ शिवलिंग मंदिराजवळ बीना नदीच्या किनाऱ्यावर सहा मित्र खोदकाम करत होते. जवळपास तीन फूट खोदकाम केल्यानंतर तिथे जे काही सापडलं ते पाहून हे मित्र अवाक् झाले. तसेच तिथे पाहण्यासाठी लोकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. आता काही जण याला दैवी चमत्कार समजू लागले आहेत. नेमकं प्रकरण काय आहे ते आपण जाणून घेऊयात.
2 / 6
सागर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र राहतगड येथील बनेनी घाटामध्ये असलेल्या १०८ शिवलिंग मंदिराजवळ नदीकिनारी केलेल्या खोदकामामध्ये पाच शिवलिंग सापडली आहेत. शिवलिंग मिळाल्याचे समजताच या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली. ही शिवलिंगं खडकावर कोरलेली आहेत.
3 / 6
येथील एक ज्येष्ठ नागरिक महेश सिलावट यांनी सांगितले की, नदी किनारी काही वर्षांपूर्वीपर्यंत शिवलिंग होती. तसेच तिथे दोन मोठे साप येत असत. मात्र कालौघात ही शिवलिंगं दिसायची बंद झाली होती. पण साप मात्र येथे अधूनमधून दिसायचे.
4 / 6
महेश सिलावट यांनी येथील पुष्पेंद्र सिंह सिलावट आणि सतीश सिलावट यांना ही माहिती दिली तेव्हा त्यांनी या जागेवर खोदकाम करण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलेल्या ठिकाणी सातत्याने खोदकाम केलं. मात्र त्यांना यश मिळत नव्हतं.
5 / 6
याचदरम्यान, काही लोकांनी एका ठिकाणी साप पाहिल्याची माहिती दिली. तिथे खोदकाम केल्यावर सुमारे ३ फूट खाली शिवलिंग सापडले. त्यानंतर या शिवलिंगाची साफसफाई करून पूजा केली. तसेच रुद्राभिषेकही केला.
6 / 6
आता याला लोक चमत्कार म्हणत आहेत. तसेच खोदकामामध्ये शिवलिंग सापडले तेव्हा त्याची व्यवस्थित स्वच्छता केली. तसेच शिवलिंगावर दुग्धाभिषेक करण्यात आला.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशhistoryइतिहासHinduismहिंदुइझम