शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पंजाबमध्ये सापडले २८२ भारतीय सैनिकांचे सांगाडे; १६५ वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 8:04 PM

1 / 8
पंजाबमधील अमृतसरजवळ असलेल्या विहिरीत भारतीय सैनिकांचे सांगाडे सापडले आहेत. हे सांगाडे १८५७ च्या राष्ट्रीय उठावादरम्यानचे असल्याची माहिती पंजाब विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. जे. एस. सरहावत यांनी दिली.
2 / 8
देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिला लढा १८५७ मध्ये देण्यात आला. त्याचवेळी २८२ भारतीय सैनिकांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हाडांचे सांगाडे उत्खननादरम्यान आढळून आले आहेत.
3 / 8
गाय आणि डुकराची चरबी लावण्यात आलेली काडतुसं न वापरण्याची भूमिका घेणाऱ्या सैनिकांची इंग्रजांकडून हत्या करण्यात आली होती. त्यांचे मृतदेह एका धार्मिक बांधकामाच्या खाली आढळून आले.
4 / 8
डीएनए अभ्यास, विश्लेषण, मानव विज्ञान, रेडिओ-कार्बन डेटिंग या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्यास सापडलेले सांगाडे भारतीय सैनिकांचेच असल्याचं स्पष्ट होत असल्याची माहिती डॉ. जे. एस. सहरावत यांनी दिली. सर्वप्रथम अजनालात २०१४ मध्ये माणसांचे सांगाडे सापडले होते.
5 / 8
२०१४ मध्ये मानवी सांगाडे आढळून आले. हे सांगाडे भारतीय सैनिकांचेच असावेत अशी शक्यता त्यावेळी वर्तवली गेली. मात्र मेच्या सुरुवातीला आलेल्या एका अहवालातून एक वेगळीच शक्यता व्यक्त केली गेली. हे सांगाडे फाळणीच्या वेळी मारल्या गेलेल्या नागरिकांचे असू शकतात, असा अंदाज वर्तवला गेला.
6 / 8
फंट्रियर्स इन जेनेटिक्स नावाच्या नियतकालिकात एक संशोधन प्रसिद्ध झालं. सापडलेले सांगाडे भारतीय सैनिकांचे असून ते २६ व्या बंगाल इन्फ्रंट्री बटालियनचा भाग होते. या बटालियनमध्ये बंगाल, ओदिशा, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील सैनिकांचा समावेश होता, अशी माहिती संशोधनातून पुढे आले.
7 / 8
सांगाड्यांबद्दल करण्यात आलेल्या संशोधनात पंजाब विद्यापीठाच्या मानववंशशास्त्र विभागासह लखनऊच्या बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलियो सायन्स, बनारस हिंदू विद्यापीठाचा प्राणीशास्त्र विभाग, हैदराबादच्या सीएसआयआरचा सहभाग होता. संशोधनाचं नेतृत्त्व मानववंशशास्त्र डॉ. जे. एस. सरहावत यांनी केलं.
8 / 8
सांगाडे आढळून येण्यास २०१४ मध्ये घडलेली एक घटना कारण ठरली. भारतीय रिसर्च स्कॉलरला २०१४ मध्ये एका ग्रंथालयात एक पुस्तक सापडलं. पुस्तकाचा लेखक एक सिव्हिल सेवक होता. १८५७ मध्ये तो अमृतसरमध्ये तैनात होता. त्यावेळी झालेल्या राष्ट्रीय उठवादरम्यान अमृतसरमध्ये एका ठिकाणी भारतीय सैनिकांची हत्या करण्यात आली. त्यांचे मृतदेह गाडण्यात आल्याची माहिती पुस्तकात होती. त्यानंतर उत्खननास सुरुवात झाली.