ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 - केरळ आणि तामिळनाडूच्या जंगलांमध्ये बेडकाच्या चार नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. विशेष म्हणजे हे बेडूक बोटांच्या नखापेक्षाही छोटे आहेत. हे बेडूक जगातील सर्वात छोट्या बेडकांच्या प्रकारात मोडतात. हे बेडूक रात्री किड्यांसारखा आवाज करतात. पश्चिम घाटावरील जंगलांमध्ये या बेडकांव्यतिरिक्त तीन मोठ्या प्रजातींमधील बेडूकही सापडले आहेत. अशाप्रकारे रात्रीच्या वेळी आढळणा-या बेडकांची संख्या सात झाली आहे. भारताच्या पश्चिम किना-यावर असलेल्या पर्वतरागांमध्ये अशा अनेक प्रकारच्या दुर्मिळ प्रजाती आहेत. यामध्ये फुलं आणि जंगली प्राणी, किटकांचा समावेश आहे. मात्र याचं आयुष्य धोक्यात आहे. अनेक वर्ष शोध घेतल्यानंतर या प्रजातींची माहिती मिळाली आहे. सर्वात छोटा बेडूक होण्याचा मान पापुआ न्यू गिनी प्रजातीच्या नावे असून त्याची उंची 8 मिमी आहे. बेडकांची संख्या जास्त असली तरी त्याचं भवितव्य धोक्या आहेत. माणसांचं अस्तित्व वाढत चालल्याने त्यांना धोका निर्माण होत आहे. शोध लागलेल्या बेडकांच्या या प्रजातींचे फोटो आणि नावे खालीलप्रमाणे - - फोटोत दिसणारा हा 12.3 मिमी उंचीच्या या बेडकाचं नाव सबरीमाला नाईट फ्रॉग असं आहे. - मनालार नाईट फ्रॉग - रॉबिनमूर प्रजातीत मोडणारा हा बेडूक 12.2 मिमी लांब आहे - 13.6 मिमी उंचीचा विजयन बेडूक - विजयन नाईट फ्रॉग - हा बेडूक अथिरापिली प्रजातीत मोडतो - 13.8 मिमी उंचीचा मलानार नाईट फ्रॉग