शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...तर आजपासून तुमच्या स्मार्टफोन्समधील WhatsApp होणार बंद

By बाळकृष्ण परब | Published: January 01, 2021 9:48 AM

1 / 6
आजपासून म्हणजेच १ जानेवारी २०२१ पासून काही स्मार्टफोन्समधून व्हॉट्सअॅपचा सपोर्ट बंद होणार आहे. त्यामुळे अशा स्मार्टफोनमध्ये आजपासून व्हॉट्सअॅप बंद होणार आहे.
2 / 6
व्हॉट्सअॅपकडून नियमितपणे नवे फिचर्स आणि सिक्योरिटी पॅच दिले जातात. त्यामुळे खूप जुन्या झालेल्या स्मार्टफोनच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमुळे त्यामध्ये नवे फिचर्स आणि पॅच दिले जाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यामधील सपोर्ट बंद करण्यात येईल, असे व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आले आहे.
3 / 6
त्यामुळे १ जानेवारी २०२१ पासून काही जुने आयफोन आणि अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही.
4 / 6
कंपनीच्या म्हणण्यानुसार आयओएस ९ मधून जुन्या व्हर्जनवर चालणारे आयफोन आणि अँड्रॉइड ४.०.३ व्हर्जनपेक्षा जुन्या सॉफ्टवेअरवर चालणाऱ्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅपचा सपोर्ट दिला जाणार नाही. हा नियम आजपासून लागू होणार आहे.
5 / 6
सध्या जगात फार कमी लोक आहेत जे अजूनही एवढ्या जुन्हा व्हर्जनचे सॉफ्टवेअर असलेले स्मार्टफोन वापरत आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या या पावलामुळे युझर्सना फारसे नुकसान होणार नाही.
6 / 6
जर तुम्हीही जुना आयफोन किंवा जुन्या व्हर्जनचा अँड्रॉइड स्मार्टफोन वापर करत असाल तुमच्याकडील व्हॉट्सअॅप तपासून घ्या. जर अपडेट उपलब्ध नसेल. तर तुम्हाला व्हॉट्सअॅपचा वापर करण्यासाठी स्मार्टफोन बदलावा लागेल.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपMobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडिया